ताज्या घडामोडीपिंपरी

पाशा पटेल यांनी आयोगाचे अध्यक्षपद सोडावे -काशिनाथ नखाते

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शेतकऱ्यांना ३६५ पैकी ३२२ दिवस संकटाशी झगडावे लागणार आहे, इतकी संकटे आहेत की झालेले नुकसान भरून येण्याची शक्यता नाही, अनिश्चितता, अतिवृष्टी दुष्काळ, गारपीट हे शेतकऱ्यांचा अविभाज्य भाग झाले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय लावून घ्यावी . सरकार नुकसान भरपाई देऊ शकत नाही असे संताप जनक वक्तव्य करणारे भाजप नेते कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना पदाचा उपयोग जमत नसेल तर दुरुपयोग न करता पद सोडून द्यावे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी केली.

वास्तविक महाराष्ट्र राज्यामध्ये दुष्काळ, नापिकीमुळे, अतिवृष्टीमुळे, गारपीट अशा अनेक संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला असताना महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात नेहमी शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मागील ४ महिन्यांमध्ये ७४० पेक्षा अधिक शेतकऱ्यानी आत्महत्या केलेल्या आहेत अशी गंभीर परिस्थिती असताना, महाराष्ट्र राज्यामध्ये पावसामुळे लाखो एकर वरील शेती पिकांचे नुकसान झालेले असताना केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष अशा पद्धतीने बेताल वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत असून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याला प्रवृत्त करत आहेत का ? असा प्रश्न पडत आहे पाशा पटेल यांनी कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पद शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या कामात सदुपयोग करावा मात्र त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करून शेतकऱ्यांचे नुकसान करणे म्हणजे सरकारची शेतकऱ्यांप्रती असलेली नीती दिसून येत असून अशा अध्यक्षाला पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही असेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार, एनटीयूएफ असंघटित कामगार विभागाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button