पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अपूर्ण वचनांविरुद्ध लॉलिपॉप चॉकलेट्सचे वितरण

काळेवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशातील बेरोजगारी, महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि अन्य अपूर्ण वचनांविरुद्ध जनतेचा आवाज ऐकवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आज काळेवाडी येथे एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले.
मोदींनी दिलेले २ कोटी रोजगार दरवर्षी देण्याचे वचन, पेट्रोल-डिझेल दरवाढ थांबवण्याचे वचन यासारखी अनेक आश्वसे पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ, या कार्यक्रमात लॉलिपॉप चॉकलेट्सचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे राज्य सचिव चंद्रशेखर जाधव यांनी केले. या वेळी पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतिक जगताप, आदी उपस्थित होते.
नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तसेच सरकारच्या निषेधार्थ या लॉलिपॉप चॉकलेट्सचे वितरण केले.
या कार्यक्रमाद्वारे युवक काँग्रेसने देशातील सध्याची परिस्थिती सरकारच्या जवाबदारीवर प्रश्नचिन्ह ठेवले आहे.













