ताज्या घडामोडीपिंपरी
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने चिंचवडमध्ये जेष्ठांचा भावनिक सत्कार

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गुरुपौर्णिमा हा गुरु-शिष्य परंपरेचा आणि जेष्ठांचा सन्मान करणारा अत्यंत महत्वाचा दिवस समजला जातो. याच अनुषंगाने चिंचवड येथील काकडे टाऊनशिप ओम गणेश सोसायटीत गुरुपौर्णिमेचा सण अतिशय उत्साहात, भावनिक आणि आदर्श पद्धतीने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात श्री दत्त व स्वामींच्या मूर्तीचे पूजन करून, सोसायटीतील जवळपास 25 ते 30 जेष्ठ नागरिकांचे औक्षण, पूजन व सन्मान करण्यात आला. जेष्ठांना श्रीफळ, गुलाबफुल, माऊलींचा फोटो देत सन्मानित केले गेले. फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत करण्यात आले, त्यामुळे वातावरण अत्यंत भावनिक झाले होते. अनेक जेष्ठांनी आपल्या भावना व्यक्त करत कार्यक्रमात रंग भरले.
या उपक्रमाची संकल्पना सोसायटी अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी मांडली व सर्व पदाधिकारी व सदस्यांनी त्याला त्वरित अनुमोदन दिले. कार्यक्रमाचे आयोजन श्री दत्त आरती मंडळ यांनी केले होते. महाआरती, भजन, जेष्ठांचे मनोगत आणि महाप्रसाद व भोजन यामुळे कार्यक्रम अधिकच प्रभावी झाला.
कार्यक्रमासाठी अध्यक्ष मधुकर बच्चे, खजिनदार अजित नाईक, सेक्रेटरी राजू कोरे यांचे विशेष सहकार्य लाभले. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक आदर्श निर्माण झाला असून, सोसायटीने संस्कृती आणि कुटुंबमूल्यांची जपणूक करत समाजात एक सकारात्मक संदेश दिला आहे.













