शालेय विद्यार्थ्यांना वेळेत पीएमपीएल बसेच्या सुविधा उपलब्ध करून द्या आदी तक्रारी नागरिकांनी जनसंवाद सभेत मांडल्या
पिंपरी चिंचवड महानगरपालिका जनसंवाद सभेत नागरिकांच्या ७० तक्रार वजा सूचना प्राप्त

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ७५ तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहे.
आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने आज जुलै महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पार पडली. यावेळी नेमून दिलेल्या समन्वय अधिकाऱ्यांनी जनसंवाद सभेचे अध्यक्षपद भूषविले.
आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे ३, ७, १२ , १६, ३, ९, ५ आणि २० अशा एकूण तक्रारी वजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.
यावेळी नागरिकांनी शहरातील प्रस्तावित डी. पी रस्ता, शालेय विद्यार्थ्यांना जाण्यायेण्यासाठी वेळेत पीएमपीएल बसेच्या सुविधा उपलब्ध करून देणे, मार्केटच्या ठिकाणची वाहतूक कोंडी दूर करणे, पावसामुळे रस्त्यांवर ठीक ठिकाणी पडलेले खड्डे बुजविणे, डासांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आवश्यक ठिकाणी किटकनाशक फवारणी करणे, उद्यानातील मोडकळीस आलेल्या लहान मुलांच्या खेळण्यांची दुरुस्ती करणे, पावसाळ्यात तुंबलेल्या नाल्यांची साफसफाई करणे, विविध उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करणे आदी तक्रार वजा सूचना जनसंवाद सभेत नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी समस्या सोडविण्यासाठी महिन्यातील दुसऱ्या व चौथ्या सोमवारी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात जनसंवाद सभेचे आयोजन काळे जाते. येथे नागरिकांनी आपल्या तक्रार वजा सूचना मांडाव्यात. त्या तक्रारी तात्काळ सोडविण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न राहील.
शेखर सिंह, आयुक्त,पिंपरी चिंचवड महानगरपालिका













