थेरगावमध्ये आज श्री बाबा रामदेव महाराज यांच्या जम्मा जागरणाचा भव्य सोहळा

थेरगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – थेरगाव येथील स्व. शंकर अण्णा गावडे स्मृती कामगार भवन येथे शनिवार दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २ वाजल्यापासून द्वारकनाथ श्री बाबा रामदेव महाराज यांचा जम्मा जागरण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमात होम हवन, महाआरती, जन्मवृत्तांत कथा आणि बाबा रामदेवजीचा ब्यावला असे पवित्र धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे हैदराबादचे सुप्रसिद्ध पारंपरिक जम्मा गायक ‘जम्मा सम्राट सुशील गोपाल बजाज’ यांचे सादरीकरण!
स्थळ:स्व. शंकर अण्णा गावडे स्मृती कामगार भवन,
शनि मंदिर मागे, थेरगाव हॉस्पिटलजवळ,
थेरगाव येथे होणार आहे, तरी सर्व भाविकांनी आपल्या मित्र-परिवारासह उपस्थित राहावे व पुण्य लाभ घ्यावा.
हे निमंत्रण समजून उपस्थित रहावे, असे आवाहन
संयोजक श्री बाबा रामदेव सोशल ग्रुप व भक्तपरिवार यांनी केले आहे.














