श्री प्राथमिक जैन विद्या मंदिर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त मातृ पूजन

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आईचे पाद्यपूजन आणि औक्षणाचा भावनिक सोहळा श्री प्राथमिक जैन विद्या मंदिर चिंचवड स्टेशन. या शाळेत हा आगळावेगळा उपक्रम घेण्यात आला.
गुरुपौर्णिमेनिमित्त संस्कारक्षम व भावनिक उपक्रम मातृ पूजन शाळेत घेण्यात आले.आई पहिला गुरु या संकल्पनेतून मातृ पूजन मोठ्या उत्साहात सोहळा संपन्न झाला.
यावेळी शिशुविहार व इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या आईचे पाद्यपूजन व औक्षण करून त्यांच्या त्यागाबद्दल व प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली .या प्रसंगी उपस्थित सर्व माता पालकांनी साश्रू नयनांनी आपल्या मुलांना शुभ आशीर्वाद दिले.
या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वर्षा काटकर यांनी गुरु म्हणजे जीवनात दिशा दाखवणारा दीपस्तंभ आहे.आई हा पहिला गुरु त्याचे महात्म्य सांगितले.सर्व उपस्थित पालकांचे व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे पालकांनी मन भरून कौतुक केले.
आजच्या युगात आवश्यक असणारा मातृ पूजन संस्कार गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये रुजविला गेला.आई वडिलांप्रती आदरभाव वृद्धिंगत करण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला .
या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका वर्षा काटकर व सर्व शिक्षक वृंद यांनी आयोजन केले.
या उपक्रमासाठी मार्गदर्शन श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे मानद सचिव ऐडव्होकेट राजेंद्रकुमार शंकरलालजी मुथा व सहाय्यक सेक्रेटरी प्राध्यापक अनिलकुमार मोतीलाल कांकरिया यांनी मार्गदर्शन केले.













