Spread the love

 

कासारवाडी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कासारवाडी जैन स्थानकामध्ये आचार्य श्री पू महाबोधी सुरीश्वरजी म सा आदि ठाणा ४ यांचे आज दि ८ जुन रोजी आगमन झाले ,आचार्य श्री आपल्या प्रवचनामध्ये म्हणाले “या स्पर्धेच्या युगामध्ये दिवसेंदिवस मनुष्य दुःखी होत चालला आहे त्याचे प्रमुख कारण स्पर्धा आणि दुसऱ्यांबरोबर केलेली तुलना!! कम्पॅरिझन आणि कॉम्पिटिशन यामुळे दिवसेंदिवस मनुष्य सुखी होण्याच्या ऐवजी दुःखी होत चाललेला आहे .याचं कारण स्वतः कडे जे आहे त्यामध्ये समाधान मानण्यापेक्षा दुसऱ्याकडे माझ्यापेक्षा जास्त आहे याचंच दुःख जास्त मनुष्याला भेडसावत आहे. असं म्हणतात की मनुष्य प्राणी हा स्वतःच्या दुःखाने एवढा दुःखी नाही की जो दुसऱ्याच्या सुखाने दुःखी आहे. आपल्याकडे मारुती कार असल्यानंतर आपण समाधानी असतो मात्र शेजाऱ्याकडे बीएमडब्ल्यू कार आल्यानंतर आपण त्याच्याशी तुलना करू लागतो आणि आपण दुःखी होतो. आपल्याला जर खऱ्या अर्थाने सुखी व्हायचे असेल तर आचार्यश्रींनी तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत . तीन स्टेप मध्ये आपण सुखी होऊ शकतो पहिली गोष्ट म्हणजे दुःखाला निमंत्रण द्या .याचा अर्थ संकटाला आणि दुःखाला हसतमुखाने सामोरे जा .

दुसरी गोष्ट – दुःख सहन करा. आणि तिसरी गोष्ट आहे तुमच्या बाबतीत घडणाऱ्या घटनेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा .आणि पुरुषार्थ करा.,निश्चितपणे सुख आणि आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही .कारण प्रत्येक रात्री नंतर सुंदर सकाळ ,सुंदर पहाट होणार असते .दुःख फार काळ टिकत नाही .दुःखाचे रुपांतर सुखामध्ये होणारच असते मात्र आपली तेवढी सहनशीलता पाहिजे आणि दुःखाला झेलण्याची आपली तयारी पाहिजे. दुःख सहन करण्याची तयारी असल्यानंतर निश्चितपणे सुखाची हिरवळ आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही.” आचार्य परमपूज्य महाबोधीजी सुरीश्वरजी म सा यांनी कासारवाडी जैन स्थानक मध्ये केलेल्या प्रवचनामध्ये जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा शुभ संदेश आपल्या प्रवचनातून दिला आचार्य श्री अतिशय ज्येष्ठ संत असून .जैन समाजामध्ये स्पष्ट आणि जीवनाला एक नवी दिशा देण्याचा संदेश देणारे संत म्हणून त्यांची ख्याती आहे .साधू साध्वीबरोबर हे विहार सेवक साधुसाध्वींबरोबर विहार करतात आणि साधू संतांची सुरक्षा करण्याचे महत्त्वाचे काम ही हे विहारसेवक करत असतात विहारसेवेच्या या कल्पनेचे शिल्पकार, म्हणून किंवा प्रणेते म्हणून आचार्य श्रीं कडे पाहिले जाते. विहार सेवा उपक्रम त्यांनी मुंबई मध्ये सुरू केला आणि भारतभर हा उपक्रम सुरु झाला. यावेळी पन्यासप्रवर प पू कृपा बिंदू विजयजी महाराज साहेब यांचेही प्रवचन झाले तर शेवटी
कासारवाडी संघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया यांनी सर्वाचे स्वागत करुन महाराजसाब बद्दल संघाचे वतीने कृतज्ञता व्यक्त करून अभिवादन केले.यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version