जाणता राजा विजयकांत कोठारी यांना श्रमण संघरत्न पुरस्कार प्रदान समारंभ संपन्न
जैन कॉन्फरन्सच्या पंचम झोनच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव समारंभ

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स च्या पंचम झोन -प्रांतीय शाखेच्या वतीने पुणे येथील महावीर प्रतिष्ठानच्या पारख सभागृहामध्ये इयत्ता दहावी बारावी आणि पदवी ,पदवीव्युत्तर यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ नुकताच पार पडला .या समारंभामध्ये सुमारे 265 विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .तसेच जाणता राजा श्री विजयकांत जी कोठारी यांना *श्रमण संघरत्न* ह्या उपाधिने प्रांतीय अध्यक्ष व पदाधिकारी आणि प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पंचम झोनचे अध्यक्ष श्री नितीनजी बेदमुथा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमांमध्ये जैन कॉन्फरन्सचे माजी अध्यक्ष अविनाशजी चोरडिया, पारसजी मोदी तसेच हर प्रांत जैन भवन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया, राष्ट्रीय उपाध्यक्ष कीर्ति दुगड , पुणे जिल्हा स्थानकवासी सकल जैन संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयकांत कोठारी, विद्यमान अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल ,कार्याध्यक्ष विलासजी राठोड, उपाध्यक्ष बाळासाहेब धोका तसेच जितो चे अपेक्स प्रेसिडेंट विजय भंडारी, महावीर प्रतिष्ठानचे विश्वस्त ॲड अरुण शिंगवी , सिध्दाचलमचे अध्यक्ष मोहनलाल संचेती मंचावर उपस्थित होते.तसेच महावीर प्रतिष्ठानचे विश्वस्त श्रीपन्नालाल जी लुनावत , जैन कॉन्फरन्सच्या पूर्व महिला अध्यक्षा विमलताई बाफना , पिंपरी चिंचवड जैन महासंघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया, जैन कॉन्फरन्स अल्पसंख्याक समितीचे प्रांतीय अध्यक्ष गिरीष पारख, महिला उपाध्यक्षा प्रा सुरेखा कटारिया, ज्ञानप्रकाश योजना प्रांतीय अध्यक्ष पी एम जैन , पुणे जिल्हा अध्यक्ष प्रा प्रकाश कटारिया आणि अनेक राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अभय लुनावत, अशोक बाफना, विलास पगारिया , संदेश गदिया आदी उपस्थित होते. या वेळी प्रारंभी पंचम झोन चे अध्यक्ष नितीन बेदमुथा यांनी प्रास्ताविक भाषणात काॅन्फरन्सच्या पंचम झोनच्या कार्यक्रमांची माहिती दिली व सभासद संख्या वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले व जैन भवन समितीचे अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया यांच्या संकल्पनेप्रमाणे प्रांतीय जैन भवन निर्माण करण्यात येणार असल्याचे सांगितले, या वेळी पुर्व अध्यक्ष अविनाश जी चोरडिया, डॉ अशोककुमार पगारिया,पत्रकार अभिजित डुंगरवाल, सौ ज्योती गदिया आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन स्वाती लुंकड यांनी केले , महामंत्री गणेश ओसवाल यांनी कार्यकारिणी सभेचे संचालन केले व वरिष्ठ उपाध्यक्ष माणिक दुगड यांनी आभार मानले,या वेळी मोटीव्हेशनल वक्ते श्री दत्ताजी कोहीनकर यांचे करिअर मार्गदर्शन वर प्रबोधनपर भाषण झाले . सदर कार्यक्रमासाठी राष्ट्रीय प्रचार मंत्री अतुल चोरडिया, प्रांतीय कार्याध्यक्ष सुवालालजी बोरा, कोषाध्यक्ष संतोष गुगळे, सह कोषाध्यक्ष श्रेणिक मंडलेचा, महिला अध्यक्षा सौ कल्पना कर्नावट, चेअर पर्सन कविता शेटिया ,युवक अध्यक्ष देवेंद्र पारख ,आणि सौरभ, वृषभ तसेच सौ ऐश्वर्या, सौ पुनम बेदमुथा आदिंनी परिश्रम घेतले.










