श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानक वासी जैन कॉन्फरन्स च्या पंचम झोन चे अध्यक्ष नितीन बेदमुथा कार्यकारिणीचा शपथविधी संपन्न

आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स, नवी दिल्ली या संस्थेच्या पंचम झोन – मुंबई पुणे प्रांत चे अध्यक्ष नितीन बेदमुथा आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी- महिला शाखेच्या अध्यक्ष कल्पनाजी कर्नावट, आणि त्यांची कार्यकारिणी ,युवा शाखेचे अध्यक्ष देवेंद्र पारख आणि त्यांची कार्यकारिणी ,या सर्व एकूण 200 पेक्षा पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य यांचा शपथविधी आकुर्डी प्राधिकरण येथील ग दि माडगूळकर सभागृहामध्ये अतिशय उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय महामंत्री डॉ अमित राय जैन , राष्ट्रीय चेअरमन विजय जी जैन, पूर्व अध्यक्ष अविनाशजी चौरडिया, पूर्वाध्यक्ष श्री पारसजी मोदी, राष्ट्रीय महिला अध्यक्षा संतोष जी जैन, राष्ट्रीय युवा अध्यक्ष विपुल जैन, युवा महामंत्री अमित जैन, उपाध्यक्ष कीर्ती दुगड, पूर्व युवा अध्यक्ष सागर सांकला , चतुर्थ झोन अध्यक्ष मोहनलालजी साकला,समन्वयक श्री सुरेशजी लुनावत , ॲड अरूण शिंगवी, मोहनलालजी संचेती तसेच पुणे जिल्हा स्थानकवासी सकल जैन संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयकांतजी कोठारी,अध्यक्ष पोपटलालजी ओस्तवाल,सचीव अनिल नहार आदी मान्यवरांच्या आणि उपस्थित असणाऱ्या बहुसंख्य बंधू भगिनींच्या उपस्थितीत पार पडला. या शपथविधीच्या माध्यमातून जैन कॉन्फरन्स च्या ध्येयाशी सुसंगत आणि देव, गुरू ,धर्म आणि समाज यांच्या हिताचे कार्य मी निष्ठेने करील अशा प्रकारची शपथ सर्वांनी घेतली ही शपथ जैन कॉन्फरन्स च्या प्रमुख पदाधिकार्यांनी दिली कार्यक्रमासाठी मुख्य शाखा, महिला शाखा आणि युवा शाखा यांचे सदस्य, मित्रमंडळी नातेवाईक, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्य शाखेच्या महामंत्री पदी गणेश ओस्तवाल, कार्याध्यक्षपदी सुवालालजी बोरा, कोषाध्यक्षपदी संतोष जी गुगळे यांची निवड झाली. तसेच महिला शाखेच्या महामंत्री पदी सुनिता चोरडिया, प्रांतीय चेअरमनपदी कविता सेठिया, कोषाध्यक्ष ज्योती गदिया,आणि युवा शाखेच्या महामंत्रीपदी विवेक गोलेचा, कार्याध्यक्षपदी आनंद नहार ,कोषाध्यक्षपदी आदित्य नहार यांची निवड झाली या सर्वांच्या विविध योजनांचे अध्यक्ष मंत्री आणि कार्यकारणी सदस्यांचा शपथविधी यावेळी पार पडला शपथविधी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया आणि महिला शाखेच्या पूर्वअध्यक्षा रुचिराजी सुराणा यांनी केले यावेळी कॉन्फरन्सचे महामंत्री डॉ अमित राय जैन यांनी काॅन्फरन्स च्या कार्याची माहिती देऊन कॉन्फरन्स ने साधू संतांसाठी समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी केलेल्या भरीव कामगिरीची माहिती दिली. व नवीन शपथ घेतलेल्या सभासदांना निष्ठेने समाजासाठी काम करण्याची प्रेरणा दिली. याचवेळी त्यांनी जैन कॉन्फरन्सचे पूर्व महामंत्री आणि विद्यमान राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया यांची नव्याने गठीत करण्यात आलेल्या” प्रांतीय जैन भवन समिती”च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राष्ट्रीय अध्यक्ष अतुल जैन यांच्या निर्देशानुसार निवड केल्याचे जाहीर केले तसेच नाशिक येथील श्री सुनील मोहनलाल जी चोपडा यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड केल्याचे जाहीर केले . शेवटी महामंत्री गणेश ओस्तवाल यांनी आभार प्रदर्शन केले.














