डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ महाराजांचा सत्कार
नवी सांगवीत कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळातर्फे आयोजन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ पिंपरी चिंचवड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड यांच्या वतीने जगदगुरू व्दाराचार्य विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त करवीर पीठाचे पिठाधीश्वर शंकराचार्य स्वामी विद्यानृसिंह भारती महाराज यांच्या उपस्थितीत कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य अशा ७५ महाराजांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
नवी सांगवीतील संस्कृती लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमाचे उदघाट्न जगतगुरु श्रीमद् शंकराचार्य स्वामी विद्यानृसिंह भारती महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. लहवितकर महाराज यांना मानपत्र, दोन लाख एक्कावन हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. तत्पूर्वी, भागताचार्य ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे यांची कीर्तनसेवा पार पडली.
डॉ. लहवितकर महाराज यांनी शंकराचार्यांचा इतिहास सांगत मी एका सामान्य कुटुंबातून आलो आहे. माझा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे, याचा आनंद आहे. आजही ग्रंथ वाचल्याशिवाय झोप येत नाही. संत साहित्यामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. जगताप परिवारामुळे मला करिअर करता आले. माझे साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्यास मदत झाली.
यावेळी मुळशीचे आमदार शंकर मांडेकर, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी महापौर माई ढोरे, शकुंतला धराडे, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे शहराध्यक्ष विजूअण्णा जगताप, उद्योजक विजय जगताप, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, सुरेश भोईर, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, अतुल शितोळे, अंबरनाथ कांबळे, गणेश सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष संजय जगताप, मनीष कुलकर्णी, संजय बालवडकर, वृक्षमित्र अरुण पवार, माजी नगरसेविका माई काटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शेखर काटे, माणिक महाराज देवकर, दत्त आश्रमाचे तुकाराम भाऊ, शिवानंद स्वामी महाराज, तानाजी जवळकर, राजू लोखंडे, ह.भ.प.डॉ. नारायण महाराज जाधव, ह.भ.प. योगी निरंजननाथ महाराज, ह.भ.प. माणिक महाराज मोरे, ह.भ.प. बाळासाहेब काशिद, ह.भ.प. बाजीराव चंदिले, ह.भ.प. जालिंदर महाराज मोरे, ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज मोरे, ह.भ.प. राघवचैतन्य महाराज, ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील, ह.भ.प. पंडीत महाराज क्षीरसागर, ह.भ.प.निवृत्ती महाराज बोरकर शास्त्री, हभप. चंद्रकांत महाराज वांजळे, हभप बब्रुवान वाघ महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.
सुत्रसंचालन ह.भ.प. शेखर महाराज जांभुळकर यांनी, आभार ऍड. अभिषेक जगताप यांनी मानले.
गुरुंनी केलेला उपदेश हा महत्त्वाचा असून, तो श्रवण करणारा शिष्यही तेवढाच ज्ञानी हवा. गुरु हा शिष्याकडून कोणत्याही सेवेची अपेक्षा करीत नाही. गुरुंनी शिष्यांना गुरू प्रमाणेच मान द्यावा. त्यात अंतर असू नये. प्रत्येकाने श्रीरामाचा जप मनोभावे करावा. जे जन्माला आले आहेत, ते एक दिवस जाणारच आहेत. पण जन्म सार्थकी लागला पाहिजे. भगवंताचे समरण करा. एकाही संताच्या बायकोने गुरु केलेला नाही. त्यामुळे बायकांनी आपल्या पतीलाच गुरु मानले पाहिजे. पतीमधला गुरु पाहणे आवश्यक आहे.
– शंकराचार्य स्वामी विद्यानृसिंह भारती महाराज




















