ताज्या घडामोडीपिंपरी
आयटीआय मोरवाडीत विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टीने स्वागत”

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मोरवाडी येथे पहिल्याच दिवशी पुष्पवृष्टी करून विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
आयटीआयचे प्रशिक्षण सत्र २०२५ -२६ नव्याने सुरू झाले असून दिनांक २ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांनी संस्थेमध्ये उपस्थित राहण्याचा पहिलाच दिवस होता.
प्रवेशित झालेले सर्व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, त्यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. पुष्पवृष्टी करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले व भेटवस्तू देण्यात आली.
शशिकांत पाटील प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना तसेच उपस्थित राहिलेल्या पालकांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे महत्त्व सांगितले.
आयटीआय संस्था, केंद्र शासन, कौशल विकास व उद्योजकता मंत्रालय, डीजीटी यांच्या अखत्यारीत संपूर्ण कामकाज चालत असल्याबाबत माहिती दिली तसेच सर्व ट्रेडस च्या विद्यार्थ्यांना रोजगार करिता तसेच स्वयंरोजगार करिता उज्वल भविष्य असल्या बाबत नमूद केले..
महापालिकेने टाटा मोटर्स सोबत डीएसटी अंतर्गत करार केला आहे.
गटनिदेशक किसन खरात यांनी विद्यार्थ्यांना संस्थेचे नियमावली, विद्यार्थ्यांचे हजेरीचे महत्व तसेच शिस्त पालन बाबत मार्गदर्शन केले.
सर्व निदेशक यांनी प्रत्येकाचे नाव ओळख व ट्रेड बाबत माहिती सांगितली.
सदर कार्यक्रमास संस्थेतील सर्व निदेशक, गटनिदेशक, कार्यालय अधीक्षक व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांसोबत पालकही उपस्थित राहिल्यामुळे त्यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.














