ताज्या घडामोडीपिंपरी

आयटीआय मोरवाडी च्या विद्यार्थ्यांना मिळणार अद्यावत इलेक्ट्रिक व्हेईकल प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी….एक अनोखा उपक्रम

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- जीआयझेड जर्मन चेंबर, डॉन बॉस्को आयटीआय, मोरवाडी आयटीआय व टाटा मोटर्स यांचे संयुक्त विद्यमानाने इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन व मेकॅनिकल मोटर वेहिकल या ट्रेडसच्या विद्यार्थ्यांना अद्यावत ईव्ही टेक्निशियन कोर्स साधारण ३ महिने कालावधीचा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदरचा कोर्स यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर व आयटीआय उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना टाटा मोटर्स येथे शिकाऊ उमेदवारी उपलब्ध करून दिली जाणार आहे व तदनंतर २ वर्षे कालावधीचा डिप्लोमा कोर्स टाटा मोटर्स यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अशा प्रकारे ईव्ही कोर्स व डिप्लोमा कोर्सेस ई संपूर्ण विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यासोबत विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

याबाबतचे चर्चासत्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था,मोरवाडी येथे आयोजित करण्यात आले होते, त्यास विद्यार्थ्यांचे पालकांनाही आमंत्रित करण्यात आले व त्यांच्याकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आहे.

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना आयटीआय पूर्ण करण्याच्या अगोदरच अद्यावत ईव्ही प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
सदर कार्यक्रमास
1) टाटा मोटर्स यांचेकडून सुशील वारंग, डीजीएम स्किल्स डेव्हलपमेंट सीव्ही प्लांट,
2)श्री शशिकांत रोडे, डीजीएम स्किल्स डेव्हलपमेंट पीव्ही प्लांट, जीआयझेड जीएमबीएच(जर्मनी) चे तांत्रिक सल्लागार
3)श्री तरुण मस्के, डॉन बॉस्को आयटीआय चे प्राचार्य निलेश चांदगुडे आदी उपस्थित होते.

शशिकांत पाटील प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्या विषयी मनोगत व्यक्त केले. किसन खरात गटनिदेशक यांनी सूत्रसंचालन केले. अरुण बांबळे, अमोल शिंदे, विशाल रेंगडे, उल्हास कुंभार, जयवंत अनपट व सोमनाथ शिंदे निदेशक यांनी कार्यक्रमाचे यशस्वीपणे संयोजन केले.

प्राचार्य
शशिकांत पाटील
औद्योगिक प्रशिक्षण विभाग
पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button