ताज्या घडामोडीपिंपरीशिक्षण

इंदिरा कॉलेजमध्ये रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; 207 विद्यार्थ्यांचे रक्तदान

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – इंदिरा कॉलेज युनिव्हर्सिटी अंतर्गत स्कुल ऑफ इन्फॉर्मीशन अँड टेक्नॉलॉजी यांच्या वतीने वाय सी एम हॉस्पिटल रक्तकेंद्राच्या सहकार्याने दिनांक 04 सप्टेंबर 2025 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण 207 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले.

सदर शिबिराचे आयोजन इंदिरा कॉलेजचे प्राध्यापक  सुमित ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

वाय सी एम हॉस्पिटल रक्तकेंद्राकडून डॉ. जयंत जाधव, डॉ. सानिया शाह, समुपदेशक श्रीमती आम्रपाली गायकवाड, अधीक्षक श्रीमती लता सुवर्णकार तसेच इतर सहकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण झाले असून, संस्थेच्या वतीने रक्तदात्यांचे आणि सर्व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button