चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी चिंचवड शहरात बकरी ईद उत्साहात साजरी

Spread the love

 

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ईद- उल – अजहा ( बकरी ईद ) हा सण हजरत अलैहिस्सलाम यांनी दिलेल्या त्यागाच्या आदर्शावर आधारित असून आपण त्यांच्या त्याआत्मबलिदानाच्या प्रेरणेतून समाजासाठी निःस्वार्थ सेवा मदत आणि एकोप्याचा संदेश घ्यायला हवा .बकरी ईदचा खरा उद्देश गरजू पर्यंत अन्न पोहोचवणे. जात- पात ,धर्म न पाहता माणुसकीची जपणूक करणे , आपापसात बंधुभाव आणि सामाजिक सलोखा निर्माण करणे आहे .ृहा संदेश पिंपरी चिंचवड शहरातील मौलाना करवी मुस्लिम बांधवांना ईदच्यानमाज पठनाच्या वेळी आज बकरी ईद सणाच्या निमित्त देण्यात आला.

आपापसात बंधुभाव आणि सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा संदेश मौलाना करवी नमाज पठणाच्या वेळी पिंपरी चिंचवड शहरात देण्यात आला.पिंपरी चिंचवड शहरात बकरी ईद उत्साहात साजरी

पिंपरी चिंचवड शहरात भोसरी, पिंपरी ,आकुर्डी ,चिंचवड, वाकड, पिंपळे गुरव, काळेवाडी , सांगवी , तळवडे, निगडी, ओटा स्कीम ,रूपी नगर , वाल्हेकर वाडी, नेहरूनगर, खराळवाडी , कासारवाडी , घरकुल , मोशी आदी भागातील मशीद व मद्रासी ईदगाह मैदानावर बकरी ईद आज सकाळी सात ते साडेनऊच्या दरम्यान तेथील मौलाना करवी नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी हीच मोठ्या उत्साहात साजरी केली .लहान मुला मुलींनी तसेच मुस्लिम बांधवांनी नवीन कपडे परिधान करून सुवासिक तेल व अत्तर लावून बकरी ईद निमित्त समुदायीक नमाज अदा केली. नमाज पठनानंतर सर्व ठिकाणी मुस्लिम बांधवांनी इच्छा एकमेकांना आलिंगन घालून ईदच्या शुभेच्छा दिल्या.

चिंचवड गाव येथील ईदगाह मैदानावर सकाळी साडेसात ते साडेनऊ दरम्यान नमाज पठण करण्यात आले . मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सामुदायिक नमाज पठण केले. पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस उपायुक्त सपना गोरे आदींनी यावेळी या परिसरात भेट दिली. ईदगाह मैदान येथे मौलाना इनामूल हक , मौलाना मीनहाज शेख यांनी मुस्लिम बांधवांना सामुदायिक नमाज पढविला. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश बांगर , यांच्या सत्कार युसुफ बऱ्हाणपुरे, इम्तियाज पानसरे ,इम्तियाज शेख यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे संयोजन अध्यक्ष इम्रान पानसरे, पिंजारी, मतीन पानसरे , आसिफ शेख, हाजी अत्तार जी .ए. आदींनी केले यावेळी चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार तसेच संधाचे पदाधिकारी इक्बाल काझी यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
चिंचवड स्टेशन येथील जामिया गौशिया ट्रस्टच्या मशिदीत सकाकी साडेसात ते नऊच्या दरम्यान नमाज पठणासाठी मोठया संख्येने मुस्लीम बांधव उपस्थित होते .यावेळी जेष्ठ नेते आझम पानसरे , निहाल पानसरे, ईशान सय्यद , माजी नगरसेवक अस्लम शेख, सादिक पठाण, अक्रम पानसरे, आदींनी संयोजन केले नमाज पठनानंतर ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांची मुस्लिम बांधवांनी भेट घेऊन त्यांना ईद च्या शुभेच्छा दिल्या.

मदरसा ए जामिया ट्रस्ट – वाल्हेकर वाडी , हुसेनी अरबी मदरसा चिंचवडे नगर , नूर ए इलाही जमात आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ वाल्हेकर वाडी चिंचवडअंजुमन तालीम कुराण दळवी नगर झोपडपट्टी चिंचवड सर्व धर्मीय स्मशानभूमी लिंक रोड पत्रा शेड , नूर ए इलाही आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ वाल्हेकरवाडी, हुसेन अरबी मदरसा, चिंचवडे नगर , मदरसा ए जामिया ट्रस्ट शिवाजी चौक ,वाल्हेकरवाडी आदी ठिकाणी नमाज पठण झाले असून ईदगाह मैदान या ठिकाणी मोठया संख्येने मुस्लीम बांधवाचा जनसमुदाय नमाज पठणास उपस्थित होता. सदर नमाज पठण च्या अनुषंगाने योग्य तो बंदोबस्त नेमण्यात आलेला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button