ताज्या घडामोडीपिंपरी

प्राधिकरणाची अवैध होर्डींगवर कारवाई

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पुणे महानगर प्रदेश‍ विकास प्राधिकरण हद्दीतील अनधिकृत होर्डिंगवर पथकाच्या माध्‍यमातून कारवाई करण्यात येत आहे. हवेली तालुक्यात लोणी काळभोरमध्‍ये नुकतीच तीन ठिकाणी अनधिकृत होर्डिंग काढण्यात आले.

लोणी काळभोरमधील या कारवाईमुळे होर्डींगधारक, ॲडव्हरटायझिंग कंपनी यांनी धसका घेतला असून प्राधिकरणाच्या विकास परवानगीकडे अंतिम चलणे भरत आहे. यासह काही होर्डींग संबंध‍ितांनी स्वत:हून काढून घेतले. अवकाळी पाऊस, वादळी वारे आदीमुळे अशा होर्डींगपासून धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंध‍ितांनी वर्दळीच्या व रहदारीच्या ठिकाणाचे धोकादायक, मर्यादेपेक्षा उंचीचे, दुबार संरचना होर्डिंग काढून घ्यावेत. तसेच होर्डींगधारकांनी अनधिकृत होर्डींगला परवानगी घेण्यात यावी, अन्यथा पीएमआरडीएच्या माध्‍यमातून एकतर्फी निष्कासन कारवाई करण्यात येईल. याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्राधिकरणाच्या सह आयुक्त डॉ. दिप्ती सुर्यवंशी-पाटील यांनी केले आहे.

संबंधित कारवाई महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दिपक सिंगला, पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे, सह आयुक्त डॉ. दिप्ती सुर्यवंशी-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. कारवाईवेळी उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार रविंद्र रांजणे, तहसीलदार सच‍िन म्हस्के, पोलिस निरीक्षक महेशकुमार सरतापे, शाखा अभियंता विष्णू आवाड, शरद खोमणे, प्रणव डेंगळे, तेजस मदने यांच्यासह स्थानिक बंदोबस्त तैनात होता.

अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा
गेल्या काही द‍िवसापासून पीएमआरडीएच्या माध्‍यमातून अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु आहे. यात बुधवारी वाघोलीतील (ता.हवेली) चालू बांधकामावर तसेच बावधनमधील (ता. मुळशी) बकाजी कॉर्नर ते स्मशान भूमीपर्यंत रस्त्याच्या दुर्तफा अतिक्रमणे काढण्यात आली. यात ३९ पत्राशेड, आरसीसी कट्टा, कंपाऊंड वॉल व टपरी आदी स्ट्रक्चर्स जमीनदोस्त करण्यात आली. यामुळे रस्त्यावरील वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button