Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»‘हिंजवडी आयटी पार्क ’’ समस्यामुक्त करण्यासाठी ‘‘सिंगल पॉईंट ॲथॉरिटी’’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आयटी फोरमच्या शिष्टमंडळाला आश्वासन
ताज्या घडामोडी

‘हिंजवडी आयटी पार्क ’’ समस्यामुक्त करण्यासाठी ‘‘सिंगल पॉईंट ॲथॉरिटी’’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आयटी फोरमच्या शिष्टमंडळाला आश्वासन

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com11 July 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंजवडी आयटी पार्कची समस्या सोडवण्यासाठी मेट्रोचे काम डिसेंबर अखेर पूर्ण करण्यात येईल. वाहतूक सक्षम करण्यासाठी प्रस्तावित रस्ते आणि संबंधित विकासकामे मार्गी लावण्यासाठी सर्व शासकीय अस्थापनांसाठी ‘‘सिंगल पॉईंट ऑथॅरिटी’’ तयार केली जाईल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

हिंजवडी आयटी पार्कमधील वाढत्या नागरी व वाहतूक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी IT फोरम आणि सोसायटी फेडरेशनच्या प्रतिनिधींनी आज विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची यांची भेट घेतली. ही महत्त्वपूर्ण बैठक भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने आयोजित केली होती. यावेळी आमदार शंकर मांडेकर, आमदार शंकर जगताप उपस्थित होते.

आयटी फोरमचे सचिन लोंढे, सोसायटी फेडरेशनचे संजीवन सांगळे यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यासोबत थेट चर्चा केली. बाणेर-बालेवाडी रेसिडेन्ट असोसिएशन, #UNCLOGHinjawadiITPark मोहीमेतील प्रतिनिधी, फोरम ऑफ आयटी एम्प्लॉईज, हिंजवडी एम्प्लॉईज ॲन्ड रेसिडेन्ट ट्रस्ट, मुळशी को-ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी फेडरेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शेखर सिंह, पुणे महानगरपालिका आयुक्त नवकिशोर राम, ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त योगेश म्हसे, राज्य सरकाचे मुख्य सचिव, एमआयडीसी, प्रोजेक्ट डायरेक्टर नॅशनल हायवे, पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड विनयकुमार चौबे, कार्यकारी संचालक महामेट्रो श्रावण हर्डिकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रशासनाची तयारी आणि कार्यवाहीची माहिती दिली.

हिंजवडी आयटी पार्क हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आयटी हब असून, दररोज सुमारे पाच लाखांहून अधिक आयटी व्यावसायिक येथे ये-जा करतात. मात्र, अपुरी पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुर्दशा आणि समन्वयाचा अभाव या समस्यांमुळे रहिवासी व कर्मचाऱ्यांचे आयुष्य कठीण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर “हिंजवडी आयटी पार्कला अडथळ्यांमधून मुक्त करा” या मागणीकडे आमदार लांडगे यांनी लक्ष वेधले.

यावेळी पीएमआरडीए प्रशासनाकडून प्रस्तावित रस्ते आणि संबंधित कामांचा ‘रोड मॅप’ याबाबत मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांच्यासमोर प्रेझेंटेशन दिले. तसेच, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातून हिंजवडीला जोडणारे डीपी प्रस्तावित रस्ते पूर्ण करण्यासाठी भूसंपादन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने कामाला गती द्यावी. राष्ट्रीय महामर्गाला जोडणारे रस्त्यांची प्रस्तावित कामे मार्गी लावण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत समन्वय करणार आहोत, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री फडणीस यांचे प्रशासनाला निर्देश :

1. सर्व विभागांच्या समन्वयासाठी ‘‘सिंगल पॉईंट ॲथॉरिटी’’
2. भूमीसंपदानाच्या कामासाठी पीएमआरडीएने पुढाकार घ्यावा.
3. लक्ष्मी चौक येथील पूल सहापदरी करा.
4. डिसेंबर अखेर हिंजवडी मेट्रो सुरू करा.
5. एमआयडीसीने रस्ता रुंदीकरणाची कामे पूर्ण करावी.
6. मेट्रो प्रशासनाने पार्किंगचे प्रोव्हीजन करावे.
7. एक महिन्यामध्ये टीडीआर द्या आणि भूसंपादन करा.
8. अध्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक नियंत्रण करा.
9. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने वाहतूक संदर्भात अंमलबजावणी करावी.
10. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाने तातडीने कामे सुरू करावीत.
11. पुनावळे, ताथवडे, भूमकर  चौक अंडरपासचे काम सुरू करावे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयटी फोरम आणि विविध सोसायटी फेडरेशनच्या शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी संबंधित शासनाच्या विभागांना तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले. हिंजवडी आयटी पार्क आणि पुणे, पिंपरी-चिंचवड परिसर ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी सर्व शासकीय अस्थापनांचे नियंत्रण विभागीय आयुक्त पाहतील, असे आदेश मुख्यमंत्री महोदय यांनी दिले आहेत. तसेच प्रस्तावित रस्ते आणि पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी ‘फास्टट्रॅक’ वर कालबद्ध नियोजन करण्यात येणार आहे. हिंजवडी आयटी पार्कच्या समस्यांबाबत पहिल्यांदाच अशी बैठक घेण्यात आली आणि विशेष म्हणजे फलदायी ठरली आहे.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा,

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleन्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त माता-पित्यांचा व गुरुजनांचा सन्मान
Next Article हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा, ३० मीटरचा पर्यायी रस्ता व नवीन मेट्रो मार्गासाठी निर्णयांची घोषणा
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.