निगडी येथे उस्फुर्त प्रतिसादात आरोग्य शिबिर संपन्न

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रसाद कोलते स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने यमुना नगर निगडी या परिसरामध्ये जीवनज्योती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल फाउंडेशन व दिव्यदृष्टी आय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि डॉक्टर चाकणे यांच्यामार्फत या भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया नेत्र तपासणी व त्यासोबत इतर रक्तदाब,मधुमेह ,इसीजी गरजेनुसार या तपासण्यांसोबत हृदयाच्या अनेक तपासण्या देखील यावेळी करण्यात आल्या.
अँजिओप्लास्टी,बायपास सर्जरी हृदय झडपांची शस्त्रक्रिया,कर्करोग शस्त्रक्रिया,रेडिएशन,मुतखडा,मोफत डायलिसिस सुविधा. अशा प्रकारच्या अनेक आरोग्यादायी सुविधा व तपासणीसाठी रविवार दिनांक 27 जुलै 2025 ला सकाळी दहा वाजेपासून परिसरातील नागरिकांनी या भव्य आरोग्य शिबिराचा लाभ घेतला यामध्ये जवळजवळ 618 लोकांनी नोंदणी करत आपल्या आरोग्याच्या तपासणी करून घेतल्या यामध्ये 45 लोकांचे मोतीबिंदू तर 40 लोकांचे हृदयाशी निगडित असणाऱ्या ऑपरेशन्स व पुढील चाचण्यांसाठी नावे आली आहेत. अतिशय प्रशस्त जागेत व तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने या तपासण्या पार पडल्या यावेळी सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पूजन करीत आरोग्य शिबिराला सुरुवात झाली यावेळी माजी नगरसेवक श्री शशिकिरण गवळी यांच्या देखील वाढदिवसा प्रित्यर्थ त्याच ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात जवळजवळ 90 लोकांनी रक्तदान केले.
या आरोग्य शिबिराच्या प्रसंगी माजी नगरसेवक अजित गव्हाणे, श्री शशिकिरण गवळी, सुलभा उबाळे,तानाजी खाडे, पंकज भालेकर यासोबत परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अक्षय कारंडे, सुलतान तांबोळी, बसवराज नाटेकर, आधी कार्यकर्ते पदाधिकारी मित्रपरिवार उपस्थित होता.
यावेळी आयोजक प्रसाद कोलते म्हणाले की,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कुठेही बॅनरबाजी मनोरंजनाचे कार्यक्रम किंवा इतरत्र काही न करता समाजासाठी उपयोगी अशा भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आणि आज परिसरातील असंख्य नागरिकांनी याचा लाभ घेतला यातच मला फार आनंद आहे ही सर्व माहिती राज्याची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना देखील कळविली आहे असे ते म्हणाले. सोबत कार्यक्रमासाठी उपस्थित हॉस्पिटल सर्व डॉक्टर,स्टाफ सहकारी व मित्र परिवारांचे देखील त्यांनी यावेळी आभार मानले.














