संकट म्हटलं की शिवसेना धावली मदतीला! अतिवृष्टीग्रस्त भागात महिलांसोबत भाऊबीज साजरी — २२५ कुटुंबांची दिवाळी गोड

भूम (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “संकट म्हटलं की शिवसेना मदतीला आलीच…” या विचाराला साजेशी कृती दाखवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पुन्हा एकदा जनतेच्या पाठीशी उभे राहून समाजकारणाची परंपरा कायम ठेवली. भूम तालुक्यातील उमाची वाडी व बागलवाडी या अतिवृष्टीग्रस्त भागातील कुटुंबांना भेट देत ग्रामीण भागातील महिलांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली.
या उपक्रमाअंतर्गत २२५ कुटुंबांना दिवाळी फराळाचे साहित्य, तसेच महिला भगिनींना साडी-चोळीचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला. अतिवृष्टीमुळे त्रस्त झालेल्या शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाचे आयोजन मावळ लोकसभेचे उपजिल्हाप्रमुख दस्तगीर भाई मणियार, चिंचवड विधानसभा प्रमुख हरेश आबा नखाते, एकनाथजी मंजाळ, लक्ष्मण टोणपे, कृष्णा येळवे, आणि प्रजाक नढे यांच्या वतीने करण्यात आले.
हा उपक्रम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, युवा सेना सचिव आमदार वरुण सरदेसाई, धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमदादा निंबाळकर, व आमदार कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
या निमित्ताने उपस्थित कार्यकर्त्यांनी सांगितले की,“वंदनीय हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण याचे सूत्र दिले. त्याच वशिल्याने आम्ही आज शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांच्या घरी दिवाळीचा प्रकाश पोहोचवला. हेच खरे समाजकारण आहे.”
या सामाजिक उपक्रमात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉ. चेतन बोराडे, युवा सेना तालुकाप्रमुख सुधीरजी ढगे, दिगंबर ढगे सर, उमाची वाडी शाखाप्रमुख आकाशराव शेळके, अनिल तात्या तीकटे, आनंदजी दोरगे (युवासेना), मा. सरपंच धनंजय शेळके, ह. भ. प. सुभाष महाराज शेळके, ईश्वर तात्या सोनवणे, बागलवाडीचे सरपंच कृष्णा चिकने, शिवाजीराव चिकने, रवी बोलभट, धनंजय बोलभट यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ, शेतकरी बांधव, महिला भगिनी आणि युवक उपस्थित होते.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील लोकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून “शिवसेना म्हणजे केवळ राजकारण नव्हे, तर समाजकारणाचा धर्म” हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.


















