चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

गुरुपौर्णिमेनिमित्त चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात अनोखा उपक्रम

Spread the love

 

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्राचीन भारतीय परंपरेनुसार गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिवस हा गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. गुरूंच्या आशीर्वादाने शिष्यांचे कल्याण तसेच त्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता व्यायाम आणि अभ्यासाबरोबरच ध्यान साधनाही महत्त्वाची असते. चिंचवड येथील विकास शिक्षण मंडळ संचलित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांना अभ्यास, व्यायाम आणि त्याचबरोबर ध्यान साधना यांची सांगड घालण्याकरिता मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष  जगदीश जाधव, सचिव  संजय जाधव संचालक  विजय जाधव यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने संस्कार मार्गदर्शन वर्ग सुरू केले. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरुपौर्णिमेचे वैशिष्ट्य आणि महत्त्व सदर कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना सविस्तर सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना ध्यान साधना अर्थात मेडिटेशनचे महत्व समजून देऊन त्यांना मेडिटेशनच्या पद्धती अवगत करून देण्यात आल्या. माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. बाळाराम पाटील पर्यवेक्षक श्री. दत्तात्रय भालेराव उपमुख्याध्यापिका  सुषमा संधान कोर कमिटी सदस्या  मनीषा जाधव व छाया ओव्हाळ हे ही सदरप्रसंगी उपस्थित होते.

LAW OF ATTRACTION समूहाच्या मार्गदर्शिका श्रीमती मृदुल सायनी आणि त्यांच्या सुपुत्री डॉ. अनन्या सायनी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना कृतज्ञतेच्या माध्यमातून सकारात्मक दृष्टिकोन कसा वृद्धिंगत करावा, याबाबत मार्गदर्शन केले. जीवनात यश प्राप्त करण्यासाठी आणि स्थैर्य निर्माण करण्यासाठी ध्यान साधना किती महत्त्वाची असते, हे सांगून त्यांनी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना मेडिटेशन करण्यास प्रवृत्त केले. विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन वर्गात आपला सक्रिय सहभाग नोंदवला.

सदर प्रसंगी इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता प्राप्त करत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा मुख्य अतिथींच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला व त्यांना भावी आयुष्याकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी भावी आयुष्यातील अपेक्षित यश प्राप्त करण्याकरिता मेडिटेशन अखंडपणे करण्याचा संकल्प सदर प्रसंगी केला. विद्यालयाचे पर्यवेक्षक  दत्तात्रय भालेराव यांनी प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणाकरिता विद्यालयात राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक  शब्बीर मोमीन यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button