संस्मरणीय गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत ‘इतना तो याद हैं मुझे…’ या संस्मरणीय हिंदी – मराठी गीतांच्या ऑडिओ – व्हिज्युअल नि:शुल्क सांगीतिक मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध झाले. निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात (छोटे सभागृह) शुक्रवार, दिनांक ०९ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष सांगीतिक मैफलीत दिशा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब जवळकर, उपाध्यक्ष संतोष बाबर, ॲड. अंतरा देशपांडे, मोहनकुमार भस्मे, नीलेश भिंगारे, विनिता भिंगारे, मल्लिकार्जुन इंगळे, साहेबराव कावळे, तुषार कदम, राजेंद्र पगारे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
विनायक कदम, नंदकुमार कांबळे, अनिल जंगम, अरुण सरमाने, डॉ. सायली बांबुरडे, नेहा दंडवते, डॉ. किशोर वराडे, पिनाक भिंगारे, स्वाती भागवत, सुहास पालेकर या गायक कलाकारांसह विशेष अतिथी गायक कलाकार विजय वाघमारे आणि ललिता जगदाळे यांनी आपल्या एकल आणि युगुलस्वरातील सादरीकरणातून चित्रपटसंगीतातील काही लोकप्रिय आणि काही विस्मरणात गेलेल्या सुमधुर गीतांचा नजराणा पेश करीत रसिकांची मने जिंकून घेतली. देवश्री कदम आणि अंकिता जंगम या बालकलाकारांनी ‘लगान’ चित्रपटातील ‘मधुबन में…’ या गीतावर केलेले बहारदार नृत्य हे या मैफलीचे खास वैशिष्ट्य ठरले.
‘फर्स्ट टाइम देखा तुझे…’ , ‘याद तेरी आयेगी…’ , ‘हर घडी बदल रही…’ , ‘तेरी तस्वीर मिल गयी…’ , ‘मैं तो एक ख्वाब हूं…’ , ‘ओ मेरे सपनों के सौदागर…’ , ‘ओ सजना बरखा बहार आयी…’ , ‘तुम को देखा तो…’ , ‘तुने अभी देखा नही…’ , ‘ना तुम हमें जानो…’ या एकल गीतांसोबतच ‘दिल जाने जिगर…’ , ‘लागी छुटे ना…’ , ‘रब को याद करू…’ , ‘फूल तुम्हे भेजा हैं…’ , ‘चेहरा क्या देखते हो…’ , ‘हम जिस रस्ते पे चले…’ , ‘इन्तेहा हो गयी…’ , ‘आँखोसें दिल में…’ , ‘तू मेरा जानू हैं…’ , ‘एक हसीना थी…’ , ‘प्यार तो एक दिन…’ , ‘बादल यूं गरजता हैं…’ , ‘तुज संग प्रीत…’ या युगुलस्वरातील गीतांना श्रोत्यांची उत्तम दाद मिळाली. ‘इतना तो याद हैं मुझे…’ या मैफलीच्या शीर्षकगीताचे अप्रतिम सादरीकरण रसिकांना खूप भावले; तर कुमार शानू यांच्या मूळ आवाजातील गीतांचा गोडवा चपखल सादरीकरणातून श्रोत्यांपर्यंत पोहोचला.
विनायक कदम आणि नंदकुमार कांबळे यांनी संयोजन केले. सचिन शेटे यांनी विशेष साहाय्य केले. शैलेश घावटे यांनी ध्वनिसंयोजन केले. सौमिल घावटे यांनी दृकश्राव्यचित्रण केले. सुहास चांगण यांनी छायाचित्रण केले. दृश्यनिर्मिती विक्रम क्रिएशनच्या साहाय्याने करण्यात आली. अरुण सरमाने आणि स्वाती भागवत यांनी निवेदन केले. नंदकुमार कांबळे यांनी आभार मानले.













