ताज्या घडामोडीपिंपरी

“गणपतीचे निमित्त, अन् इच्छुकांचा ‘फ्लेक्स उत्सव’!”

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात गणेशोत्सवात आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भावी नगरसेवक तसेच, इच्छुकांची चमकोगिरी सुरु झाली आहे. शहरात विशेषत: प्रभागात फ्लेक्स, बॅनर तसेच, स्वागत कमानी लावून नागरिकांवर प्रभाव पाडला जात आहे. त्यामुळे शहर विद्रुप होत असून, वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

शहरातील सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस, स्वागत, निवडणूक, धार्मिक व अन्य कार्यक्रमांचे अनधिकृत फ्लेक्स लावले जातात. यामुळे शहर विद्रुप होते. वाहतुकीसही अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अनधिकृत फलक लावू नयेत, यासाठी सर्व राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी व शहराध्यक्षांना महापालिकेने पत्राद्वारे आवाहन केले.
माजी नगरसेवकांसह इच्छुक रिचार्ज झाले आहेत. त्यांनी प्रसिद्धीसाठी सर्व तंत्राचा वापर सुरू केला आहे. प्रसिद्धीची कोणतीही संधी ते सोडत नाहीत. शहरातील विविध चौका-चौकात फ्लेक्स लावले जात आहेत.

गणेशोत्सवानिमित्त स्वागत, आधारस्तंभ, मुख्य सल्लागार, युवा नेते, भावी नगरसेवक, दादा, अण्णा आप्पा, भाऊ असे फ्लेक्स प्रभागासह झळकत आहेत. विशेषत: सार्वजनिक गणेश मंडळाचा परिसर, चौक, वर्दळीच्या ठिकाणी, बस थांबे तसेच, गणेश विसर्जन घाट आदी जागा मिळेल त्या ठिकाणी फ्लेक्स लावले जात आहेत. त्यात सत्ताधार्‍यांसह विरोधी पक्षातील माजी नगरसेवक व इच्छुकांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button