ताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र
अंगारकी चतुर्थी निमित्त दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अंगारकी चतुर्थी निमित्त पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
यनिमित्त मंदिरात पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलं यामध्ये पहाटे तीन वाजता ब्राह्मणस्पती सुद्धा अभिषेक करण्यात आला यानंतर पहाटे चार ते सहा या वेळात प्रसिद्ध गायक कुणाल गांजावाला यांनी आपली गायन सेवा बाप्पा समोर सादर केली. यावेळी त्यांनी विविध भक्ती गीते सादर करून उपस्थित त्यांची मने जिंकली.
यानंतर गणेशा सहस्त्रावर्तन आधी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं अंगारकी चतुर्थी निमित्त मंदिर रागीबेरंगी फुलांनी सजवण्यात आलं.
बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली अंगारकी चतुर्थी निमित्त परिसरातील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली.








