ताज्या घडामोडीपिंपरी

वाकडमधील सोसायट्यांचा कौल गणेश व सारिका कस्पटे दाम्पत्याकडे; प्रभाग २६ मध्ये सत्ता परिवर्तनाची ठाम नांदी

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २६ मध्ये राजकीय वातावरण तापत असून, वाकड येथील विविध गृहनिर्माण सोसायट्यांनी गणेश सयाजी कस्पटे व सारिका गणेश कस्पटे दाम्पत्याला दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे सत्ता परिवर्तनाची स्पष्ट चाहूल लागली आहे.

वाकड येथील बर्ड व्हॅली बँक्वेट हॉलमध्ये आयोजित भव्य सोसायटी मेळाव्यात परिसरातील नामांकित सोसायट्यांचे पदाधिकारी, सदस्य, नागरिक व स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एरोस मिडोज, माउंट वर्ड, पारस विस्टा, मालपाणी ग्रीन्स, ड्रीम कॅसल, पार्क वेज, अतुल पॅरेडाईझ, डायनस्टी, प्रिस्टिन वुड्स यांसह अनेक सोसायट्यांचे प्रतिनिधी या मेळाव्यात सहभागी झाले होते.
मेळाव्यात नागरिकांनी पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, रस्ते, स्वच्छता, सुरक्षा, पार्किंग आदी मूलभूत प्रश्नांसह सोसायट्यांशी संबंधित विविध समस्या मांडल्या. यावेळी उमेदवार गणेश कस्पटे यांनी प्रभागातील आजवरच्या विकासकामांचा आढावा घेत भविष्यातील ठोस विकास आराखडा मांडला. “वाकड परिसराचा सर्वांगीण विकास, सोसायट्यांच्या प्रश्नांचे प्राधान्याने निराकरण आणि पारदर्शक, जबाबदार प्रशासन देणे हेच आमचे ध्येय आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

सारिका कस्पटे यांनी महिलांसाठी विशेष उपक्रम, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा तसेच तरुणांसाठी विकासाभिमुख योजना राबवण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या या भूमिकेला उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात पाठिंबा दर्शविला.
या सोसायटी मेळाव्यामुळे प्रभाग क्रमांक २६ मधील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत मिळत असून, आगामी निवडणुकीत कस्पटे दाम्पत्याची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button