“सहा दिवस सहा वाटा” एक आगळेवेगळे अभियान

निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – फ्रेंड्स ट्रेकिंग क्लब च्या वतीने “सहा दिवस सहा वाटा” हे अभियान दुर्गा टेकडी येथें राबवण्यात आले.
युवकनव नवीन सदस्य यांच्यामध्ये गिरीभ्रमणाची आवड निर्माण व्हावी आणि मोबाईल सारख्या मध्यमा पासून त्यांचे लक्ष दूर व्हावे या उद्देशाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
सलग सहा दिवस वेगवेगळ्या वाटांनी चढाई करत हे आगळेवेगके अभियान संपन्न झाले. फ्रेंड्स क्लब चे अध्यक्ष वसंत ठोंबरे आणि जेष्ठ गिर्यारोहक विश्वास सोहोनी यांच्या संकल्पनेतून ही मोहीम संपन्न झाली. यामध्ये तीनशे पेक्षा जास्त सदस्य सहभागी झाले होते.
अभियानाचे उद्घाटन क्लबचे अध्यक्ष वसंत ठोंबरे यांच्या हस्ते झाले. समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, प्रसिद्ध सूत्रसंचालक, शिव व्याख्याते राजेंद्र घावटे हे उपस्थित होते.
₹कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजेंद्र घावटेजी यांनी ” विविध ट्रेकच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व कार्य फ्रेंड्स ट्रेकींग क्लब समाजापर्यंत पोचवत आहे, ही बाब खूप महत्त्वाची आहे. क्लबच्या कार्याला माझ्या शुभेच्छा”.
दुर्गा टेकडी “सहा दिवस सहा वाटा” यामध्ये लोखंडी गेट पासून जंगल मार्ग ही वाट ,तर मंदिराच्या अलीकडे डाव्या बाजूला धबधब्या च्या शेजारी वर जाणारी अशा अवघड वाटा होत्या.
सदर अभियानात विविध वयोगटातील आबालवृद्ध यांचा समावेश होता
अभियान हे नुसते चालणे व चढाईचे नव्हते तर या अभियानात घोषणा ,जागर , गाणी, गण गवळण ,अभंग, भारुड , पोवाडे, विनोद याची रेलचेल होती.
अभियानातून आनंद , समाधान मनःशांती, मेंदूचा मसाज, मनाची साफसफाई, श्वासाचे व्यायाम, भरभरून हसणे, योग , हलके व्यायाम यातून शरीराच्या शुद्धीचे धडे सर्वांनी गिरवले.
अभियानात संदीप पोतनीस , सुभाष चव्हाण विनोद इनामदार , विश्वास सोहोनी यांनी गाणी सादर केली, तर शाहीर जयसिंग कांबळे यांनी पोवाडे, महाराष्ट्र गीत गाऊन वीरश्री निर्माण केली.
मनाला आलेली मरगळ कुठल्या कुठे पळून गेली. हे या अभियानाचे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे…
या अभियानातून नवीन माहिती,तंत्रज्ञान,अनुभव कथन, काव्य, उखाणे , विनोद याचा आनंदही आबालवृद्धांनी लुटला.
सांगता कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वास सोहोनी यांनी केले..
फ्रेंड्स ट्रेकिंग क्लब ची माहिती,अभियानाचे महत्त्व,ट्रेकिंग चे महत्व , भविष्यकाळातील योजना याबद्दल सविस्तर माहिती उपस्थितांना सांगितली गेली..
अभियानात सहभागी झालेल्या सदस्यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात वंदना सोहोनी,रेखा पालकर, सुभाष चव्हाण यांनी भारुड कविता गाणी सादर केले.
महिला प्रतिनिधी रजनी शेलार, अश्विनी कुलकर्णी,जयश्री पाखरे, संगीता कुलकर्णी , मृणाल लोध,अनिता दुबे, रेखा पालकर, रंजना ठोंबरे ,वंदना सोहोनी ,अलका कांबळे , अनिता दुर्वे, रेखा पालकर, पोतनीस ताई यांचा सहभाग उल्लेखनिय होता.
अभियान यशस्वी करण्यासाठी श्रीकांत जोशी, सुभाष चव्हाण,मधुकर देवकर, संजय पालकर, संजय दुर्वे, प्रदीप पवार, गणेश लोध, निलेश रबडे, संदीप पोतनीस, विनोद सेठ, मल्लिकार्जुन इंगळे यांचे सहकार्य मोलाचे ठरले.
विजयकुमार निकुंभ,गणेश लोध, गिनीज बुक रेकॉर्ड करणारा मिलिंद देशमुख, सुभाष चव्हाण, निलेश रबडे यांच्यामुळे हे अभियान सर्व दूर पोहोचले.














