ताज्या घडामोडीपिंपरी
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काय होणार? आज ‘सर्वोच्च’ फैसला

नवी दिल्ली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काय होणार? जिथे आरक्षण मर्यादा ओलांडली गेली अशा नगरपरिषद, नगरपंचायतींबद्दल काय निकाल दिला जातो, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांबद्दल शुक्रवारच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय काय निर्देश देणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ठिकाणच्या निवडणुका रद्दही केल्या जाऊ शकतात, असे संकेत मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने दिले होते. तसेच याबद्दलची आकडेवारी शुक्रवारी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.




















