ताज्या घडामोडीपिंपरी

सर्वसामान्यासाठी अहोरात्र काम करणारा नेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या  रूपाने महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिला- शंभूराज देसाई

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काम करण्याची पध्दत वेगळीच आहे. सर्वसामान्य लोकांसाठी 18-18 तास काम करणार नेता महाराष्ट्रातील जनतेने एकनाथ शिंदेच्या रूपाने पहिलांदाच बधितला असेल. त्यामुळे आज त्यांना जो श्रम महर्षी पुरस्कार देण्यात येत आहे. ही त्याच कार्याची पावती आहे, असे उद्गार राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी काढले.
पुणे सातारा चेंबर ऑफ कॉमर्स तसेच पुण्यातील श्रमिक, कामगार आणि उद्योजक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले, वंदे मातरम प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक पंडीत, डमार्क मल्टीवेंचर कंपनीचे संचालक गणेश दरेकर, पुणे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष विजय सोनावले, संस्थापक अरुण कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
पर्यटन मंत्री श्री देसाई म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी 2004 साली शिवसेनेचे आमदार म्हणून सभागृहात गेलो. तेव्हा पासून त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा प्रयत्न गेली 20-22 वर्षे करत आहे. आज शिंदे साहेबांना पुणे सातारा चेंबर ऑफ कॉमर्स तसेच पुण्यातील श्रमिक, कामगार आणि उद्योजक यांच्या संयुक्त विद्यमाने श्रम महर्षी पुरस्कार देऊन आज सन्मानित करण्यात आले, ही खूप मोठी गौरवाची बाब आहे.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतात. सातारा जिल्ह्यात श्री. शिंदे यांचे कार्य खूप मोठे आहे. जिल्ह्यात आलेल्या आपत्ती काळात पुरात अडकलेल्या लोकांना त्यांनी वेळोवेळी मदत केली. पुरात बेघर झालेल्या 534 कुटुंबांना त्यांनी हक्काचे घर उपलब्ध करुन दिले आहे. यातील काही घरांचे बांधकाम झाले असून उर्वरित घरे आगामी सहा सात महिन्यात पूर्ण होतील. श्री. शिंदे यांनी त्यांच्या दरे या गावात अनेक लोकांचे प्रश्न सोडविले आहेत. श्री. शिंदे यांनी गोरगरीब लोकांसाठी केलेल्या कार्यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे, असे श्री. देसाई म्हणाले.
कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांना देण्यात आलेला श्रम महर्षी पुरस्कार त्यांच्यावतीने पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी स्वीकारला. तसेच यावेळी यशवंत भोसले यांना श्रम योगी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात दैनिक पवना समाचारच्या सुवर्ण महोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्रास्ताविकात विजय सोनावले यांनी पुणे सातारा चेंबर ऑफ कॉमर्स संस्थेच्या कार्याची माहिती विषद केली. कार्यक्रमाला या परिसरातील उद्योजक, विविध संस्थांचे पदाधिकारी, कामगार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button