Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»इंद्रायणी नदी स्वच्छ, सुंदर , प्रदूषण मुक्त करणार :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ताज्या घडामोडी

इंद्रायणी नदी स्वच्छ, सुंदर , प्रदूषण मुक्त करणार :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com10 May 2025No Comments5 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

इंद्रायणी नदी स्वच्छ, सुंदर , प्रदूषण मुक्त करणार :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आळंदी भक्त निवासासाठी २५ कोटी जाहीर ; ज्ञानभूमी प्रकल्पास सर्वोतोपरी सहकार्य

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  राज्यातील वारकरी संप्रदाय आणि नागरिक, भाविकांचे श्रद्धास्थान इंद्रायणी नदी विकासासाठी प्राधान्याने कामे हाती घेऊन केंद्रे सरकार, राज्य शासन तसेच सर्वांचे सहकार्याने इंद्रायणी नदी स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषण मुक्त करण्याची ग्वाही देत….आळंदी देवस्थानचे ज्ञानभूमी प्रकल्पास गती देऊन भक्त निवासाचे काम हाती घेण्यास २५ कोटी रुपयांचा निधी नगर विकास विभागाचे माध्यमातून देत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी, आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त आयोजित दीपोत्सव, इंद्रायणी नदी पूजन प्रसंगी उपमुख्यामंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. आळंदीत तत्पूर्वी ज्ञानोबा माउली, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल हरिनाम गजरात संत ज्ञानेश्वर महाराज यांचा वैभवी रथोत्सव शुक्रवारी ( दि.९ ) भाविक, वारक-यांचे हरिनाम गजरात झाला. रथोत्सवात श्रींचा चांदीचा मुखवटा पूजा ,आरती दर्शनास भाविकांनी गर्दी केली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि पारायण सोहळ्या निमित्त या रथोत्सव – दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

त्यांनतर इंद्रायणी घाटावर इंद्रायणी पूजन, दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त नदीचे दुतर्फ़ा विद्युत रोषणाई, नदी घाटावर तसेच प्रदक्षिणा मार्गावर फटाक्यांची आतिषबाजी, इंद्रायणी नदी पूजन, इंद्रायणी आरती, श्रींचे आरती नामजयघोषात झाल्या. यावेळी इंद्रायणी नदीचे दुतर्फ़ा महिलांनी प्रज्वलित केलेले दिवे इंद्रायणी नदी पात्रात मोठ्या भक्तिभावाने सोडत श्रद्धा जोपासली. व्यापारी तरुण तर्फे दीपोत्सवासाठी विशेष सहकार्य करण्यात आल्याचे माऊली ग्रुपचे प्रमुख माऊली गुळुंजकर, अजित मधवे यांनी सांगितले.

श्रींचे जन्मोत्सवी वर्षा निमित्त आयोजित दीपोत्सवात केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपसभापती निलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उत्तम जाणकार, विजय बापू शिवतारे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, आळंदी देवस्थान आणि आळंदी ग्रामस्थ, पदाधिकारी यांचेसह हजारो महिला, पुरुष भाविक मान्यवर उपस्थित होते. हरिनाम गजरात मिरवणूक प्रदक्षिणा श्री विठ्ठल जय घोषात झाली. ग्रामस्थ युवक तरुणांनी ज्ञानेश्वर महाराज यांचे ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त प्रथा परंपरांचे पालन करीत नाम जय घोषात रथोत्सव साजरा झाला. रथोत्सवापूर्वी व नंतर श्रींची पालखी खांद्यावर पुन्हा मंदिरात हरिनाम गजरात आणण्यात आली. आळंदी ग्रामस्थ यांनी आळंदी देवस्थानचे नियंत्रणात उत्साहात दीपोत्सव, रथोत्सव, इंद्रायणी नदी पूजन, आरती वेदमंत्र जयघोषात मंगलमय वातावरणात कार्यक्रम पार पडला. यावेळी इंद्रायणी पूजनाचे पौरोहित्य वेदमूर्ती निखिल प्रसादे यांनी केले.

यावेळी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, संस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमाजी नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, राजाभाऊ चौधरी , श्रींचे सेवक बाळासाहेब चोपदार, मानकरी योगीराज कुऱ्हाडे, मंगेश आरु, राहुलशेठ चितळकर पाटील योगेश आरू, बाळकृष्ण मोरे, आळंदी देवस्थानचे पदाधिकारी सेवक, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री स्वामी महाराज मठ चाकण चौक येथून हरिनाम गजरात रथोत्सव सुरु झाला. यावेळी राज्यातून आलेल्या भाविकांनी दर्शनास गर्दी केली. प्रदक्षिणा मिरवणूकींने रथोत्सवाचे स्वागत विविध ठिकाणी उत्साहात झाला. यावेळी विविध संस्थांनी रथोत्सव सोहळ्याचे स्वागत केले. ग्रामस्त व भाविकांनी रथ प्रदक्षिणा मार्गे नगरपरिषद चौकात आणला.
रथोत्सवाला निघण्यापूर्वी पालखी फुलांनी सजविण्यात आली. या पालखीत माउलींचा चांदीचे मुखवटा पालखीत वैभवी पूजा बांधीत ठेवण्यात आला. ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेत माऊली मंदिरात आणली.

आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी विशेष दक्षता घेत इंद्रायणी नदी लगत आणि पात्रात विशेष स्वच्छता केली. नदी पात्रात पाणी सोडण्यात आल्याने दीपोत्सव वैभवी झाला. इंद्रायणी नदी पात्रात भाविक, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उपाय योजना करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी खांडेकर यांनी दिली. ते म्हणाले, भाविकांनी इंद्रायणी नदीपात्रात पुढे जाऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली. यासाठी आळंदी नगरपरिषद अग्निशमन दल यांचे माध्यमातून पथक तैनात करण्यात आले होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधत असताना हरीनाम जयघोष केला. जन्मोत्सव सोहळा भव्य दिव्या स्वरूपात होत असल्याचे सांगत सोहळ्यास उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले. हा सोहळा महाराष्ट्रात साजरा होत आहे. या साठी राज्यातून इंद्रायणी तीरावर वारकरी, धारकरी, लाडके भाऊ, बहिणी, भाविक आले आहेत. या सोहळ्यास शुभेच्छह देत ते म्हणाले, ज्ञानभूमी नेहमी येथे बोलवत असते, आळंदी हे ठिकाण आनंद देणारे आहे. मनापासून शुभेच्छा देत त्यांनी लोकांना एक तरी ओवी अनुभवावी असं आवाहन केले. कर्तव्या समोर नाती गोती काही नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील संरक्षणासाठी बैठक घेतली. पहेलगाम हल्ल्याचे उत्तर ऑपरेशन सिंदूर राबवून चोखूत्तर दिले. यात आपले येथील दोन जवान शाहिद झाल्याचे सांगत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. ज्ञानेश्वरीचे महत्त्व किती आहे. सर्वाना माहिती आहे. ते म्हणाले, येथील चर्चेत इंद्रायणी नदी माऊली भक्तांची आहे. टी प्रदूषण मुक्त झाली पाहिजे. केंद्र व राज्य सरकार मिळून काम करावे लागेल. यासाठी लाखो लोकांचे हात लागतील. सरकारची ही जबाब्दारी आहे. इंद्रायणी नदी स्वच्छ, सुंदर, प्रदूषण मुक्त करायची आहे. मी हि वारकरी आहे. सर्व संतांचे कृपेने प्रत्येक जण येथे काम करतोय.

लोककल्याणकारी योजना राबविल्या. यामुळे हे सरकार तुमचे आहे. वारकऱयांचे आहे. ज्ञानभूमी प्रकल्पाची ४५० एकर जागा असून टप्प्या टप्प्याने काम पूर्ण केले जाईल. येथील आराखडा राबविण्यास सरकार आपल्या पाठीशी आहे. सर्वाना शुभेच्छा आळंदीसाठी जे काय करायचे आहे. केले आहे. या कामात समाधानी आहे. ज्ञानभूमीचे कामामुळं सर्वांचे ज्ञानात भर पडणार आहे. सर्व एकत्र येऊन काम करू. प्राधान्याने भक्त निवासाचे काम सुरु करू असे सांगत त्यांनी यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी नगरविकासाचे माध्यमातून उपलब्ध करून देत असल्याची घोषणा केली. यावेळी केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांचेसह इविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन आळंद देवस्थानचे विश्वस्त निलेश महाराज लोंढे यांनी केले. आळंदी ग्रामस्थ, आळंदी देवस्थान, आळंदी नगरपरिषद, वारकरी संप्रदाय यांनी दीपोत्सव, रथोत्सवास विशेष परिश्रम घेतले. दिन्डी मिरवणूक रथोत्सवात अगदी लहानगयांपासून वयोवृद्ध जेष्ठ नागरिक, महिला पुरुष आपापल्या सहकुटुंब, मित्रपरिवारासह या माऊलींच्या भव्य दिव्य मिरवणूक सोहळ्यामध्ये सहभागी होऊन हजारो मान्यवर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleवाहतूक सक्षमीकरण : पिंपरी-चिंचवडमधील 42 ‘मिसिंग लिंक’चा प्रश्न मार्गी! – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आश्वासन
Next Article तिसऱ्या, चौथ्या  ट्रॅकसाठी राज्य सरकारचा निधी द्या  खासदार श्रीरंग बारणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.