डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेज आकुर्डीच्या महिला संघाचा शूटिंगबॉल स्पर्धेत तृतीय क्रमांक, महाविद्यालयाच्या संघाची दमदार खेळी
आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डी. वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डीच्या महिला संघाने पुणे जिल्हास्तरीय शूटिंगबॉल स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश मिळवले आहे. म्हेत्रे स्पोर्ट्स ग्राउंड चिखली येथे झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक नामांकित संघांनी सहभाग नोंदवला असताना आकुर्डी महाविद्यालयाच्या संघाने दमदार खेळ करून सर्वांचे लक्ष वेधले.
विजयानंतर डी वाय पाटील एज्युकेशन कॉम्प्लेक्सचे ट्रस्टी तेजस पाटील आणि कॅम्पस डायरेक्टर निवृत्त एडमिरल अमित विक्रम यांनी महिला संघाचे अभिनंदन करून त्यांचे मनोबल उंचावले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. पी. मालथी यांनी संघाच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे आणि जिद्दीचे कौतुक करत खेळाडूंचा गौरव केला. डीन अॅडमिनिस्ट्रेशन डॉ एस एस सरनोबत आणि रजिस्टार प्रशांत भालेराव यांनी संघाचे अभिनंदन करत पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
संघाच्या या यशात शारीरिक शिक्षण संचालक आबाजी माने यांच्या मार्गदर्शनाचा महत्त्वपूर्ण वाटा असून त्यांच्या प्रशिक्षणामुळे संघाने प्रभावी कामगिरी केली. या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण असून महिला संघाचे सर्व स्तरांतून मनापासून अभिनंदन करण्यात येत आहे.




















