‘युनिव्हर्सल ह्यूमन व्हॅल्यू ‘ उपक्रमाला प्रतिसाद, डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग आकुर्डी येथे कार्यशाळेचे आयोजन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग आकुर्डी येथे ऐआयसीटीई नवी दिल्ली मान्यताप्राप्त युनिव्हर्सल ह्यूमन व्हॅल्यू या विषयावरील तीन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. डी वाय पाटिल शैक्षणिक संकुलाचे संचालक रियर एडमिरल अमित विक्रम यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन झाले उपस्थितांमध्ये ऐआयसीटीआयई नवी दिल्लीचे प्रमुख प्रशिक्षक महेश कोलते ,सहाय्यक प्रशिक्षक अनिता माने, निरीक्षक रेवती देशपांडे ,संकुलाचे मुख्य वित्तीय अधिकारी बिपिन शर्मा , महाविद्यालयाच्या प्राचार्या पी मालती आणि प्रशासकीय अधिष्ठाता संदीप सरनोबत होते
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महेश कोलते यांनी आपल्या भाषणात ऐआयसीटीई विद्यार्थी प्रेरण कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या युनिव्हर्सल ह्यूमन व्हॅल्यूज प्राध्यापक विकास कार्यक्रम युएचविआय’चा उद्देश स्पष्ट केला त्यांनी सांगितले की हा कार्यक्रम प्राध्यापकांना मूल्याधारित शिक्षण अध्यापन पद्धतीत समाविष्ट करण्यासाठी मार्गदर्शन करणारा आहे तसेच सार्वत्रिक मानवी मूल्ये समग्र मानवी विकासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
रियर एडमिरल अमित विक्रम यांनी आपल्या भाषणात प्रत्येकाच्या आयुष्यात शिस्त आणि मूल्यांचे महत्व अधोरेखित केले तसेच संकुलामध्ये राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही दिली
महाविद्यालयाच्या प्राचार्या पी मालती यांनी या कार्यशाळेचा उद्देश प्राध्यापकांनी मूल्यांची ओळख करून ती वैयक्तिक व शैक्षणिक जीवनात लागू करण्याचा आहे असे सांगितले त्यांनी प्राध्यापकांना शिक्षण पद्धतीत मूल्याधारित दृष्टिकोन आत्मसात करण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाविषयी सविस्तर माहिती देत लतिका देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले कार्यशाळेची नियमावली आणि FDP संदर्भातील माहिती अनिता माने आणि रेवती देशपांडे यांनी दिली
या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख अशोक मोरे युएचविआय अधिष्ठाता लतिका देसाई आणि ईएनटीसी विभागाच्या मनीषा राजपूत कार्य पाहत आहेत.




















