ताज्या घडामोडीपिंपरी

अविरत परिश्रम हीच यशाची गुरुकिल्ली – डॉ. पांडुरंग भोसले

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी येथील बी. व्होक. मास कम्युनिकेशन या विभागातील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ सोहळा महाविद्यालयाच्या संभाजीनगर चिंचवड येथे शनिवार दि.16 ऑगस्ट 2025 रोजी संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपट क्षेत्रातील छायाचित्रण दिग्दर्शक रणजीत माने व सजना या मराठी चित्रपटातील मुख्य अभिनेता आकाश सर्वगोड उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भोसले म्हणाले की गोरगरीबांच्या मुलांना शिक्षण घेता यावे व वंचित घटक शिक्षणाच्या प्रवाहात यावा यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.
गरीब मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी कमवा व शिका योजनेची सुरुवात केली.
मुलांनी परिस्थिती नाही म्हणून शिक्षण थांबवण्यापेक्षा काम करून शिकलं पाहिजे.
जो माणूस काम करायला लाजतो तो मोठा होऊ शकत नाही.

ओबडधोबड दगडाला आकार दिला की त्याची सुंदर मूर्ती बनते त्यासाठी त्याला घाव सोसावे लागतात . त्यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटी बरोबरच कष्ट करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ पांडुरंग भोसले यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ दत्तात्रय हिंगणे यांनी केले तर प्रा . दत्तात्रय बिडबाग यांनी पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून दिला. कार्यक्रमास कैलास पुरी, प्रा.अनिरुद्ध देशमुख , ऋषभ पवार व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी रणजित माने व आकाश सर्वगोड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृती आळणे व एस आर चौगुले यांनी केले तर आभार प्रदर्शन महेक पाटील यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button