ताज्या घडामोडीपिंपरी
डॉ. मनीषा शेवाळे-सुर्वे यांना पीएच. डी.

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील डॉ. मनीषा भिकन शेवाळे-सुर्वे यांनी वारंगल, तेलंगणा येथील एस. आर. विद्यापीठातून स्ट्रक्चरल रेट्रोफिटिंग विषयात संशोधन करीत पीएच. डी. पदवी प्राप्त केली आहे.
डॉ. मनीषा भिकन शेवाळे-सुर्वे यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये हाय अॅस्पेक्ट रेशो कॉलम रेट्रोफिटिंग युजिंग स्पेशलायझ्ड फॅब्रिक मॉर्टार टीआरएम मेथड या विषयावर संशोधन केले. हे नाविन्यपूर्ण संशोधन स्ट्रक्चरल रिहॅबिलिटेशन डिझाईन क्षेत्रात महत्त्वपूर्ण असे आहे. या संशोधनासाठी त्यांना अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. पीएच. डी. पदवी प्राप्त करीत त्यांनी उल्लेखनीय शैक्षणिक उपलब्धी मिळविली आहे.
कुटुंबाची जबाबदारी व संशोधन यामध्ये उत्तम समतोल राखत त्यांनी केलेल्या यशस्वी संशोधनाचे विशेष कौतुक होत आहे.















