ताज्या घडामोडीपिंपरी

डॉ. केतन भास्कर रिकामे यांना एस्ट्रोफिजिक्समध्ये पीएच. डी. प्रदान

Spread the love

 

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी येथील डॉ. केतन भास्कर रिकामे यांना ख्राईस्ट युनिव्हर्सिटी, बंगलोरकडून एस्ट्रोफिजिक्समध्ये पीएच. डी. (विद्यावाचस्पती) पदवी प्रदान करण्यात आली.

डॉ. केतन रिकामे हे बंगलोर येथील रामण रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये ब्लॅकहोल आणि अवकाशीय घटकांमधून येणाऱ्या क्ष किरणांचा अभ्यास करण्यासाठी उपकरण बनवण्यावर संशोधन करत आहेत. या उपकरणाला एक्सरेपोलरोमीटर म्हणतात, आणि हे तयार उपकरण केलेल्या टीममध्ये डॉ. केतन यांचा सहभाग होता. सदरचे उपकरण भारताचे श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून दिनांक जानेवारी २०२४ रोजी प्रक्षेपित झालेल्या *XPosat* या भारतातील पहिल्या व जगातील दुसऱ्या उपग्रहामध्ये बसविण्यात आले आहे. यामध्ये डॉ. केतन यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांबरोबर काम केले.

या उपग्रहाच्या माध्यमातून अवकाशातील ब्लॅक होलचा अभ्यास करण्याचे काम सुरू झाले आहे. डॉ. केतन आणि टीम यांनी तयार केलेल्या या उपकरणातून एक्सरेच्या माध्यमातून येणारे संदेश ग्रहण करून त्याचे संकलन केले जाते. त्यानुसार रामण रिसर्च इन्स्टिट्यूट, बंगलोर येथे पुढील संशोधन केले जाते.

डॉ. केतन यांनी Indian Institutes of Science Education and Research, Pune या संस्थेमधून बी.एस., एम. एस. ही पदवीव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर पुणे येथील *आयुका* , Caltech University, California इत्यादी ठिकाणी विविध प्रकल्पांवर काम केले.
गेली पाच वर्षे रामण रिसर्च इन्स्टिट्यूट, बंगलोर येथे डॉ. बिश्वजित पॉल व डॉ. व्ही. जितेश यांच्या मार्गदर्शनाखाली केतन रिकामे संशोधन करीत असून भारतीय अंतराळ संशोधन संस्था येथेही काम केले आहे.
या सर्व संशोधनाचा *अगदी उपकरण तयार करणे, उपग्रहामध्ये बसवणे, अंतराळात पाठवणे, त्याचे संदेश मिळवणे व त्यावर संशोधन करणे* साठी डॉ. केतन यांना दिनांक ३१ मे २०२५ रोजी अग्रमानांकित अशा ख्राईस्ट युनिव्हर्सिटीकडून पीएच.डी. ही पदवी प्रदान करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय स्तरावर या उपग्रहाची माहिती देण्यासाठी व त्याद्वारे मिळालेली निरीक्षणे मांडण्यासाठी इन्स्टिट्यूटच्या वतीने डॉ. केतन रिकामे यांनी साऊथ आफ्रिका, इटली व भारतातील विविध ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग घेतला आहे.
डॉ. केतन रिकामे ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडीचे माजी विद्यार्थी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button