ताज्या घडामोडीपिंपरी

आत्मविश्वास जागृत ठेवाल तर यश मिळेल – डॉ. दीपक शहा

Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा महाविद्यालयात विविध शाखेत प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा इंडक्शन प्रोग्राम 2025 चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शाह उपस्थित विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावरती संस्थेच्या संचालिका डॉ. तेजल शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, प्रभारी प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, विभाग प्रमुख डॉ. जयश्री मुळे डॉ अनामिका घोष, डॉ. हर्षिता वाच्छानी , प्रा. हेमलता चव्हाण आदी उपस्थित होते.

महाविद्यालयातील संस्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी कल्याण समिती, क्रीडा विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक, विविध गुणदर्शन, प्रश्नमंजुषा, नृत्य, सायबर सिक्युरिटी , जनजागृती कार्यक्रमाचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले. महाविद्यालयात शिस्त, वर्तणूक कशी असावी याची शपथ मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी विद्यार्थ्यांना दिली. मिस्टर व मिस फ्रेशर स्पर्धेत क्षितिज रणसिंग ( एफ. वाय. बी. कॉम.बी. एम.).सानिया यादव ( एफ. वाय. बी.एस्सी ए.आय.). यांनी बहुमान पटकाविला. त्याचा सन्मान प्रभारी प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी व सीईओ डॉ राजेंद्र कांकरिया यांनी केला. स्पर्धेचे परीक्षण प्रा. हनुमंत कोळी, डॉ. रूपा शहा, डॉ . अनामिका घोष, डॉ. दिनेश लाहोरी यांनी केले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. दीपक शहा पुढे म्हणाले , खरोखर माझ्या आयुष्यात काही बदल, सुधारणा होणार आहेत का? अशा अनेक प्रश्नांनी या महाविद्यालयात तुम्ही प्रवेश घेतला. स्पर्धेच्या युगात परीक्षेतील गुणा बरोबर तुमच्या व्यक्तिमत्त्वात किती बदल होतो हेही खूप महत्त्वाचे आहे. आपल्या सुप्त कलागुणांच्या विकास झाला पाहिजे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ध्येय मोठे ठेवा, ते गाठण्यासाठी दिवस-रात्र एक करा. मेहनत घ्या , अतोनात कष्ट करा. जिद्द प्रयत्नामुळे आयुष्यात यश मिळणार आहे. महाविद्यालयातील तीन वर्षात जे संस्कार होतील त्यामुळे पाया मजबूत होईल. तीन वर्षे प्रचंड कष्ट करा. अवांतर वाचन करा. स्वतःला समृद्ध करण्याकरिता काय करता येईल याचा विचार करा. मित्र चांगले ठेवा. पाय खेचणारे मित्रापासून दूर राहा, त्यांना टाळा. सुखदुःखात बरोबर चालतील असे मित्र संगतीत ठेवा, असे सांगून विद्यार्थ्यांना उत्तम आयुष्याची सुरुवात करण्याकरिता शेवटी शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रभारी प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा जैन यांनी केले तर आभार डॉ. जयश्री मुळे यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रिडा अधिकारी डॉ. आनंद लुंकड, सांस्कृतिक विभागाचे प्रा. रोहित अकोलकर, विद्यार्थी कल्याण विभागाच्या प्रा. ज्योती इंगळे, प्रा. कानंन पडते , राष्ट्रीय सेवा योजनाचे प्रा. सुकलाल कुंभार, प्रा. सुप्रिया गायकवाड, संदीप शहा आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button