शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार संघटनेच्या राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्षपदी डॉ. भारती चव्हाण यांची नियुक्ती

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शेतकऱ्यांचे पंचप्राण श्रद्धेय युगपुरुष शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार संघटना महासंघात राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार आणि गुजरात प्रदेशाच्या महिला आघाडी अध्यक्ष नीलिमा देसाई यांनी डॉ. भारती चव्हाण यांची राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. यासोबतच डॉ. महेंद्र काबरा यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे.
सर्वाधिक महत्त्वाची म्हणजे डॉ. भारती चव्हाण यांना महा ऍग्रो फेडरेशनच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली असून, महा ऍग्रो कंपनीच्या डायरेक्टर व्हाईस चेअरमन पदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संघटनेच्या विविध विभागांमध्ये इतर १० नियुक्त्याही जाहीर झाल्या आहेत.
डॉ. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळणार, अशी अपेक्षा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार आणि इतर पदाधिकारी व्यक्त करत आहेत. शेतकरी आणि कामगार क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्यामुळे संघटनेस नवा प्रोत्साहन मिळणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या या संघटनेतल्या या नियुक्त्या महत्त्वपूर्ण ठरतील, असे सांगण्यात आले आहे.















