पिंपरी-चिंचवड येथील डॉ. आदित्य पतकराव यांचा शासकीय दंत महाविद्यालयात सन्मान व गौरव

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या ४४ व्या स्थापना दिनानिमित्त, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व सध्या पिंपरी चिंचवड येथे जागतिक दर्जाची दंतसेवा देणारे डॉ. आदित्य पतकराव यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. माया इंदुरकर यांच्या हस्ते डॉ. आदित्य पतकराव यांना Certificate of Appreciation देऊन गौरवण्यात आले.
या विशेष कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, तसेच विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान डॉ. आदित्य पतकराव यांनी शासकीय दंत महाविद्यालय अल्युमनी असोसिएशन साठी १ लाख रुपयांची मदत जाहीर करत, १ लाख रुपयांचा धनादेश मंत्री अतुल सावे व सतीश चव्हाण यांच्या उपस्थितीत अधिष्ठाता डॉ. इंदुरकर यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी ५०० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी मंत्री अतुल सावे यांनी डॉ. आदित्य पतकराव यांच्या सामाजिक कार्याचे व योगदानाचे विशेष कौतुक केले.
माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा डॉ. जयश्री पगारे व डॉ. राजन महिंद्रा यांनी देखील डॉ. आदित्य यांचे कौतुक केले
तसेच, डॉ. आदित्य पतकराव यांनी लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स तर्फे पाठवलेले प्रमाणपत्र आणि मेडल महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. माया इंदुरकर यांना प्रदान करून गौरव केला.












