पिंपरीतील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कंडक्शन सिस्टीम पेसमेकर प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण
“कंडक्शन सिस्टीम पेसमेकर प्रक्रिया” आरोग्यसेवेत नाविन्यपूर्ण आणि सुरक्षित पर्याय

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरीतील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तज्ज्ञ डॉ.
चेतन भोळे यांच्या नेतृत्वाखाली ह्दयविकाराच्या तरुणाला वारंवार चक्कर येण्याच्या तक्रारी होत्या या
रुग्णावर अत्याधुनिक कंडक्शन सिस्टीम पेसमेकर बसविण्यात यश मिळवले. ही प्रक्रिया पारंपरिक
पेसमेकरला एक सुरक्षित आणि अधिक नैसर्गिक पर्याय देणारी आणि लक्षणीय प्रगती साद्य करणारी ही
नावीन्यपूर्ण थेरपी हृदयरोगावर अत्यंत प्रभावी उपाय आहे.
यापूर्वी व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया झालेल्या या तरुण रुग्णाला हृदयरोग तज्ज्ञ डॉ. दिग्विजय नलावडे
यांच्या देखरेखीखाली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला, उपचार योजनेत पारंपरिक पेसमेकरचा समावेश होता. तथापि, रुग्णाचे तरुण वय आणि नियमित पेसमेकरशी संबंधित संभाव्य हृदयबंद पडण्यासारखे धोके लक्षात घेऊन डॉ. भोळे यांनी कंडक्शन सिस्टीम पेसमेकरची निवड केली. हे प्रगत तंत्रज्ञान हृदयाच्या नैसर्गिक विद्युत प्रणालीप्रमाणे काम करते, गुंतागुंत कमी करते आणि अधिक उत्तम परिणाम देते.
ज्याने पूर्वी हृदयाच्या व्हॉल्व्ह प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली होती, तेव्हा हृदयरोग तज्ज्ञ डॉ. दिग्विजय
नलावडे यांच्या देखरेखीखाली रुग्णालयात दाखल झाला. सुरुवातीला उपचाराच्या योजनेत पारंपारिक
पेसमेकर टाकण्याचा समावेश होता. परंतु रुग्णाच्या तरुण वय व पारंपारिक पेसमेकरमुळे दीर्घकालीन
काळात उद्भवू शकणार्या हृदयदोषासारख्या धोके लक्षात घेऊन, डॉ. भोळे यांनी कंडक्शन सिस्टम
पेसमेकर' वापरण्याचा निर्णय घेतला. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान हृदयाच्या नैसर्गिक विद्युत प्रणालीची नक्कल
करते, ज्यामुळे गुंतागुंत कमी होतात व उपचारात्मक परिणाम सुधारतो.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील म्हणाल्या, “डीपीयू सुपर स्पेशालिटी
हॉस्पिटलमध्ये, आम्ही आमच्या रुग्णांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय उपचार आणण्यासाठी समर्पित आहोत
आणि उच्चतम गुणवत्तेच्या काळजी व नवोपक्रम सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहोत. आमच्या तज्ञांच्या
टीमने यशस्वीरित्या केलेली कंडक्शन सिस्टम पेसमेकर शस्त्रक्रिया हृदयविज्ञान क्षेत्रातील एक उल्लेखनीय
प्रगती आहे. ही प्रक्रिया उपचाराच्या कार्यक्षमतेत आणि रुग्णांच्या जीवनातील गुणवत्तेत वाढ करणाऱ्या
अत्याधुनिक, रुग्णकेन्द्रित उपाययोजना आमच्या बांधिलकीचे द्योतक आहे. आम्हाला अभिमान आहे की,
आम्ही वैद्यकीय नावीन्याच्या आघाडीवर आहोत आणि समाजाला जागतिक दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध
करून देण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत.”डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे विश्वस्त आणि खजिनदार डॉ. यशराज पाटील म्हणाले, या उल्लेखनीय
कामगिरीतुन मिळेल यश आज आम्हाला प्रगत वैद्यकीय सेवेतील उत्कृष्टतेचा नवा अध्याय घडविल्याची
भावना व्यक्त होते. आम्ही केलेल्या प्रयत्नांना लोकांकडून मान्यता मिळणे हे मन:प्रफुल्लित करणारे आहे
आणि त्यांचा सातत्यपूर्ण विश्वास आम्हाला प्राप्त होत आहे. आम्ही रुग्णसेवेच्या जबाबदारीशी बांधिल राहून
जगस्तरीय आरोग्यसेवा देण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
“हे पेसमेकर उपचारात एक क्रांतिकारी टप्पा आहे,” असे कार्डियोलॉजी विभागातील सहाय्यक प्राध्यापक,
डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे येथील हृदयरोग
तज्ज्ञ डॉ. चेतन भोले यांनी सांगितले. “पेसमेकर थेरपीतील हे एक मोठे परिवर्तन आहे. हृदयाचे ठोके
निर्माण करणाऱ्या पारंपरिक पेसमेकरच्या तुलनेत हा कंडक्शन सिस्टीम पेसमेकर शरीराच्या नैसर्गिक
लयीशी सुसंगतपणे काम करतो. यामुळे केवळ हृदय बंद पडण्यासारखे धोके कमी होत नाहीत, तर कमकुवत
हृदय असलेल्या रुग्णांसाठी एक चांगला, अधिक किफायतशीर पर्याय देखील उपलब्ध होतो”
यशस्वीरित्या पूर्ण झालेली ही प्रक्रिया, रुग्णांच्या वैयक्तिक गरजांनुसार अत्याधुनिक उपचार प्रदान
करण्याची डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची वचनबद्धता अधोरेखित करते. हा टप्पा वैद्यकीय उत्कृष्टता
आणि उत्तम रुग्णसेवा केंद्र म्हणून रुग्णालयाची प्रतिष्ठा वाढवतो.








