ताज्या घडामोडीपिंपरी
उत्साह पूर्ण वातावरणात रिपब्लिकन सेनेचा स्नेह मेळावा संपन्न

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पिंपरी चिंचवड शहर आणि मावळ लोकसभा रिपब्लिकन सेनेच्या वतीने पत्रकार बंधू भगिनींचा व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा उत्साह पूर्ण वातावरणात शनिवारी पिंपरी येथे संपन्न झाला.
पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष गुलाब पानपाटील यांनी निमंत्रित केलेल्या स्नेह मेळाव्यात व पत्रकार बंधू, भगिनींच्या दिवाळी फराळ कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, उपाध्यक्ष महावीर जाधव, डिजिटल मीडिया अध्यक्ष विनय सोनवणे, संजय सूर्यवंशी, मारुती बानेवार, पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील उर्फ बाबू कांबळे तसेच पिंपरी चिंचवड, मावळ परिसरातील बहुसंख्य पत्रकार बंधू, भगिनी उपस्थित होते. रिपब्लिकन सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष (पश्चिम) दीपक जगताप, मावळ लोकसभा युवक अध्यक्ष शंकर गायकवाड तसेच मुकुंदराव रणदिवे जेष्ठ नेते तथा प्रदेश सदस्य, संजय ठोंबे, प्रभारी पिंपरी चिंचवड शहर, दयानंद सरवदे युवक अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर, आनंद नरवाडे महासचिव, संतोष उबाळे उपाध्यक्ष, सचिन सोनकांबळे उपाध्यक्ष, शेखअली पठाण उपाध्यक्ष, रणजीत घोबाळे सचिव, रमेश कांबळे संघटक, श्रुती मराठे महिला अध्यक्षा महिला आघाडी पुणे जिल्हा, गणेश शिरसागर, सागर जेठीथोर, दीपक आल्हाट, समाधान सरवदे, दीपक गुडगुडे आदींसह पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधीही उपस्थित होते.
स्वागत गुलाब पानपाटील यांनी केले तर आभार दीपक जगताप यांनी मानले.













