युवा नेते दिनेश यादव यांच्याकडून स्वराज भोसले यांचा घरी जाऊन सत्कार

चिखली (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नुकत्याच मुंबई येथे झालेल्या स्टेम नॅशनल चॅलेंज या राष्ट्रीय स्तरावरील भव्य स्पर्धेत चिखलीतील स्वराज भोसले यांनी आदित्य मुंडे व हर्षद शिंदे या सहकाऱ्यांसह सुवर्णपदक पटकावले. या यशामुळे चिखली व परिसरात आनंदाचे वातावरण असून, ग्रामस्थांमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कुदळवाडी-चिखली ग्रामस्थांच्या वतीने युवा नेते दिनेश लालचंद यादव यांनी स्वराज भोसले यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी ग्रामस्थ, नातेवाईक व मान्यवर उपस्थित होते.
सत्कार प्रसंगी दिनेश यादव म्हणाले की, “चिखलीतील मुलांनी देशपातळीवर केलेली कामगिरी ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. स्वराजसारखे तरुण हे भविष्यातील आदर्श आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या ग्रामस्थांकडून सदैव सहकार्य मिळेल.”
स्वराज भोसले यांनी या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “हे यश माझे एकट्याचे नसून माझ्या टीममधील सहकारी, शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांचे आहे. पुढे आणखी मोठ्या पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करेन.”
सत्कार कार्यक्रमात कुदळवाडी व चिखलीतील नागरिकांनी स्वराज व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.














