कुदळवाडी परिसरात विकासकामांसाठी पाहणी दौरा – दिनेश यादव यांचा पुढाकार

कुदळवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कुदळवाडी परिसरात रस्त्यांची दुरवस्था, खड्डे, तुटलेले पेविंग ब्लॉक यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर आज स्थापत्य विभागाचे अधिकारी बालाजी पांचाळ यांच्या सोबत स्थानीक प्रतिनिधी दिनेश यादव यांनी विविध ठिकाणी पाहणी दौरा करत नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचविल्या.
रस्ते दुरुस्ती, खड्डे बुजविणे, आणि पेविंग ब्लॉकच्या दुरुस्तीबाबत त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
दिनेश यादव यांनी गेल्या काही महिन्यांपासून विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करत स्थानिक समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
या दौऱ्यादरम्यान अनेक नागरिकांनी आपले प्रश्न मांडले, त्यावर संबंधित विभागाला त्वरित कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले.दिनेश यादव म्हणाले की, “नागरिकांच्या अडचणी सोडवणे हेच माझे प्रथम कर्तव्य आहे. कुदळवाडी परिसराचा सर्वांगीण विकास हीच माझी दिशा व ध्येय आहे.”














