ताज्या घडामोडीपिंपरी

दिनेश यादव यांच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन

Spread the love

 

कुदळवाडी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारताच्या एकात्मतेसाठी प्राणार्पण करणारे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनेश लालचंद यादव यांच्या जनसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम राष्ट्रभक्तीने भारलेला आणि प्रेरणादायी ठरला.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. मुखर्जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या जीवनकार्यावर, राष्ट्रहितासाठी केलेल्या संघर्षावर आणि बलिदानावर प्रकाश टाकण्यात आला.

या वेळी प्रमुख उपस्थितीत दिनेश लालचंद यादव,महेश मोरे,महेश डोंगरे ,सोहन गुप्ता यांच्यासह परिसरातील नागरिक, युवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कार्यक्रमात बोलताना दिनेश यादव म्हणाले, “डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं योगदान भारतीय लोकशाही, एकात्मता आणि राष्ट्रवादासाठी अनमोल आहे. त्यांचे ‘एक देश – एक विधान – एक प्रधान’ हे तत्त्व आजही मार्गदर्शक आहे.”

महेश मोरे आणि इतर वक्त्यांनी देखील मुखर्जींच्या कार्याची माहिती देत आजच्या तरुण पिढीने त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी भारतमातेच्या जयघोषात आणि “डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी अमर रहें!” च्या गजरात अभिवादन अर्पण केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button