दिवाळीनिमित्त स्वच्छता-आरोग्य कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता – भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष दिनेश यादव यांचा विधायक उपक्रम
महापालिका प्रशासनाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि आपुलकीचा सण. याच सणाच्या पार्श्वभूमीवर कुदळवाडी येथे एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. आरोग्य, सफाई आणि ड्रेनेज विभागातील कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या समाजासाठी केलेल्या अमूल्य योगदानाची दखल घेण्यात आली.
या सन्मान सोहळ्याचे आयोजन भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष दिनेश यादव आणि ईद्रायंणी महिला प्रतिष्ठान अध्यक्ष निशा यादव यांनी केले. कार्यक्रमात सर्व कर्मचाऱ्यांना मिठाई आणि भेटवस्तू प्रदान करून त्यांच्या निष्ठेचे, मेहनतीचे व सेवेचे मनापासून कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमात संरपंच काळुराम यादव, चेअरमन दत्तात्रय मोरे, तात्यासाहेब सपकाळ, किसन आप्पा यादव, कोडिंबा यादव, मुरलीधर पवार, लालचंद यादव, विलास यादव, दिपक ठाकुर, अमित बालघरे, काका शेळके, विलास घुले, सुरेश वाळुंज, दिपक घन, प्रकाश चौधरी, स्वराज पिजंण, राजेश घुले, मेघा यादव आदी उपस्थित होते.
हा कार्यक्रम म्हणजे केवळ सन्मानाचा नव्हे, तर एक सामाजिक जाणीवेचा आणि सेवाभावाचा उत्सव ठरला. गावकऱ्यांच्या वतीने कर्मचाऱ्यांना दिलेली ही श्रद्धांजली समाजात सकारात्मकतेचे आणि ऐक्याचे भाव नक्कीच वाढवणारी ठरली. या मान्यवरांनी कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांचे कार्य गौरवले आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
“ही दिवाळी फक्त प्रकाशाची नाही, तर आपल्यासाठी झटणाऱ्या हातांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे. या कर्मचाऱ्यांमुळेच आपला परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी राहतो. त्यांना एक छोटीशी भेट देऊन मोठ्या सेवेचे स्मरण करून देणे, हाच आमचा उद्देश होता. हा उपक्रम दरवर्षी अधिक व्यापक स्वरूपात राबवणार आहोत. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांनी कुदळवाडी अधिक स्वच्छ, निरोगी आणि सुंदर होत आहे.
– दिनेश यादव, शहराध्यक्ष, युवा मोर्चा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.













