वसुबारसेला गोधनाचा सन्मान करत गोरक्षणाचा संकल्प!
भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव यांच्या पुढाकारातून पार पडला कार्यक्रम

– संस्कृतीचा गंध जपणारा भाजपा युवा मोर्चाचा स्तुत्य उपक्रम
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिखली व कुदळवाडी परिसरात वसुबारसच्या निमित्ताने पारंपरिक गाय-वासरांचे पूजन अत्यंत श्रद्धा आणि उत्साहात पार पडले. या कार्यक्रमामध्ये भाजपा युवा मोर्चाच्या पुढाकारातून अध्यक्ष दिनेश यादव यांच्या संकल्पनेतून, केवळ धार्मिक परंपरा नव्हे तर गोरक्षणाची सामाजिक आणि संस्कृतिक जाणीव ही अधोरेखित करण्यात आली.
चंद्रभागा गोशाळा (रामदास नगर), पै. निलेश यादव फार्म (कुदळवाडी), गणेश किसन आप्पा यादव फार्म (इंद्रायणी वजन काट्या मागे) या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने गाय व वासरांचे पूजन करण्यात आले. गोभक्त, महिला मंडळ आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमात गाय केवळ एक पवित्र प्राणी नाही, तर ती आपल्या संस्कृतीची मूळ प्रेरणा आहे. असा संदेश देण्यात आला. उपस्थित नागरिकांनी केवळ पूजनापुरते न थांबता, वर्षभर गोसेवेसाठी कार्यरत राहण्याचा संकल्पही केला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते, स्थानिक गोसेवक, महिला मंडळ व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
“आजच्या धावपळीच्या युगात आपल्या संस्कृतीशी असलेली नाळ कायम ठेवणे गरजेचे आहे. वसुबारस ही एक परंपरा नसून, भारतीय मूल्यांची आठवण करून देणारा दिवस आहे. या निमित्ताने समाजाने गोरक्षणासाठी सजग होणे ही काळाची गरज आहे.”
दिनेश यादव
अध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर













