उन्हाळ्यात चाराटंचाई भासल्याने दिनेश यादव यांनी शेतातील चारा दिला गोशाळेसाठी

चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उन्हाळ्यात चाराटंचाई भासल्याने दिनेश यादव यांनी शेतातील चारा गोशाळेसाठी उपलब्ध करून दिला.छत्रपती शंभूराजे गोशाळा भोसरी व चंद्रभागा गोशाळा चिखली येथे चारा देऊन गोमातेची पूजा केली, चारा टाकला व तिचे दर्शन घेतले. गोमातेची सेवा ही केवळ परंपरा नसून आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे अनेक ठिकाणी गोशाळेसाठी चारा मिळत नाही त्यात हिरवा चारा मिळणे अवघड आहे.या सर्व गोष्टींचा विचार करून दिनेश यादव मित्रपरिवार वतीने जेवढा शक्य होईल तेवढा चारा गोशाळा उपलब्ध होईल तो देण्याचा प्रयत्न करीत आहेत
स्वतःच्या शेतातील हिरवा चारा गोशाळेसाठी देण्यात आला.भारतीय समाजामध्ये गोमातेचं स्थान मातेसमान आहे. तिची सेवा केल्याने केवळ पुण्यच मिळत नाही, तर आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा, समाधान आणि आत्मिक शांती मिळते.
आज या कार्याच्या माध्यमातून मी एक संकल्प घेतला आहे, “माझ्या संपूर्ण कार्यकाळात गोसेवा अखंडपणे सुरू ठेवेन, गोसंवर्धनासाठी प्रत्येक पातळीवर प्रयत्नशील राहीन आणि गोमातेचे रक्षण ही माझी सामाजिक जबाबदारी म्हणून निभावीन.” या गोसेवेच्या पावन कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळणे हेच माझ्यासाठी सर्वात मोठं आशीर्वाद आहे.
यावेळी किसन आप्पा यादव,लालचंद यादव ,अमित बालघरे, भिमराव साठे,वैभव वाघ,सचिन डिबंर उपस्थित होते.













