ताज्या घडामोडीपिंपरी

ॲड. संजय माने व शिलचंद्र हजगुडे यांची धर्मवीर संभाजी बँकेच्या तज्ञ संचालक पदी निवड

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित आणि रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या धर्मवीर संभाजी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या तज्ञ संचालक पदावर ॲड. संजय गणपत माने आणि शिलचंद्र हसगुडे यांची पुढील एक वर्षासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

बँकेचे अध्यक्ष बाबुराव शितोळे यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत ॲड. माने व हजगुडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. ॲड. संजय माने हे अनुभवी पत्रकार असून सातारा येथील जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कासपठारच्या कार्यकारी समितीचे आणि शहरातील अनेक सहकारी सोसायट्यांचे व गृहनिर्माण सोसायट्यांचे कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. शिलचंद्र हजगुडे हे नामांकित सनदी लेखापाल आहेत अशी माहिती व्यवस्थापक कालिदास सुतार यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button