ताज्या घडामोडीपिंपरी

नगराध्यक्ष पदाच्या करोडोंच्या बाजारात सर्वसामान्य दीपक कांबळे ठरताहेत शहरवासीयांचे आकर्षण

Spread the love

 

पाचगणी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पाचगणी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जाती करिता आरक्षित झाल्याने अनेकांना पदाच्या डोहाळ्यांनी वेधलं आहे. गुडघ्याला बाशिंग बांधून लाखों करोडोंच्या वार्ता चर्चा बाजारात चालू झालेत. तर लग्नाला तयार होऊन अक्षता पडण्याची वाट पहातायेत. याच दरम्यान दिपक कांबळे घरोघरी जाऊन आपला चेहरा नगराध्यक्ष पदाला कसा साजेशा आहे. हे सांगत असल्याने या चेहऱ्याची वेगळीच चर्चा बाजार कट्यावर झडत आहे.

पाचगणी नगर परिषदेच्या इतिहासात प्रथमतः नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जाती करिता आरक्षित झाले आहे. अद्यापि निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नाही. मात्र दीपावली नंतर केव्हाही निवडणूक कार्यक्रम लागू शकतो. याच पार्श्वभूमीवर अनेकांनी नगराध्यक्ष पदाचे दावेदार म्हणून स्वतःला प्रमोट करण्यास सुरवात केली आहे. या करिता लाखो करोडों खर्चाच्या बाजार चर्चा झडु लागलेत.

त्याच दरम्यान या चर्चेत आपणच नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार म्हणून जनतेच्या माध्यमातून स्वतःची चाचपणी करण्याकरिता दिपक कांबळे भेटी गाठींवर भर देत आहेत. त्यामुळे नकळत लोकांच्या चर्चेत कांबळे यांचे नाव पुढे येते आहे. यामुळे निवडणूकपूर्व चर्चांना ऊत आला आहे. या मांदियाळीत अनेक “चेहरे बोलविणे आल्याशिवाय नाही” म्हणून आघाडी पॅनलमध्ये गुंतून राहिले आहेत. वेट अँड वॉच भूमिकेत आहेत.

तर टेबललॅन्ड नाक्यावर लागलेलं भव्य क्टआउट बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये अनुसूचित जातीचा नगराध्यक्ष कसा असावा ? हे दर्शविल्याने जातीय ध्रुवीकरण, चर्चेच्या स्थानी आले आहे. नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा असावा अशी नागरिकांची धारणा असल्याने या बोर्डची चर्चा सर्वत्र सुरू आहे. असे असतानाही जातीपातीच्या बाहेर जाऊन दीपक कांबळे यांनी छुप्या प्रचारात आघाडी घेतल्याने त्यांचा शहरात त्यांचाच बोलबाला चालू आहे.

पाचगणीचे नगराध्यक्षपद निवडणुकीपूर्वीच अनेकांनी स्वतःच खुर्चीत बसल्याचे बंद डोळ्यांच्या स्वप्नात पाहत आहेत. नगराध्यक्ष पदाचे बोलके चित्र उघड्या डोळ्यांत अनेकाना खुणवतेय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button