दापोडी जैन धर्म स्थानकात महाप्रभावशाली भक्तामर महास्तोत्र संपुट समापन कार्यक्रम संपन्न
धर्म प्रभावक प पूज्य प्रशांतॠषिजी म सा आदि ठाणा ३ यांच्या सान्निध्यात मंगलमय वातावरणात संपन्न

दापोडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – परमपूज्य प्रशांत ऋषी महाराज साब यांच्या मंगल वाणीने संपूर्ण भक्तामर स्तोत्र संपुट आराधना मंगलमय वातावरणात संपन्न झाली. दापोडी येथील जैन धर्म स्थानकात भक्तामर या स्तोत्राचे 48 श्र्लोक व त्यांचा अर्थ, विश्लेषण व प्रवचन वि त्याची संपुट आराधना 48 दिवस नियमीतपणे चालू होती . आज शेवटच्या गाथेची 48 व्या श्लोकाची संपूट साधना 48 दंपत्ति व इतर भाविक पण सम्पुट साधने साठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रावकांनी श्वेत वस्त्र आणि श्राविकांनी लाल साडी परिधान केली होते. संपुट साधनेच्या श्लोकांच्या उच्चाराने वातावरण अतिशय मंगलमय झाले होते. आनंदशिष्यरत्न परमपूज्य प्रशांत ऋषीजी महाराज साब यांनी भक्तामर स्तोत्रातील सर्व श्र्लोकांचे महत्व विशद केले. प. पूज्य विजयस्मिताजी म आणि प पूज्य करूणाश्री जी म यांनीही उपस्थित भक्तांना स्तोत्राबद्दल मार्गदर्शन केले भक्तामर स्तोत्र हे अतिशय प्रभावी स्तोत्र मानले जाते आणि या प्रत्येक श्र्लोकामध्ये खूप मीठी शक्ति एक विशेष मीठी शक्ति सामावलेली आहे आणि ज्याचा अनुभव निश्चितपणे साधकाला होतो. असे त्यांनी प्रतिपादन केले.
या भक्तामर स्तोत्राच्या समापन प्रसंगी उपस्थितांमधुन लकी ड्रॉ काढण्यात आला आणि ड्रॉमध्ये नंबर आलेल्या व्यक्तींना भेटवस्तू देण्यात आली या लकी ड्रॉचे लाभार्थी सौ लता पगारिया कासारवाड़ी, मनीष लुंकड जलगांव, वैशाली चोरडिया आलंदी आणि विलास पगारिया कासरवाड़ी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे अध्यक्ष श्री दिलीप भन्साळी यांनी केले सर्व सभासद, बहुमंडळ, युवक मंडळ यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी विशेष परिश्रम घेतले.




















