ताज्या घडामोडीपिंपरीपुणेमहाराष्ट्र

श्री गणनायक रथातून निघणार ‘दगडूशेठ’ गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे १३३ वे वर्ष ; यंदा देखील दुपारी ४ वाजता सहभागी होणार

Spread the love

 

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने उत्सवाच्या १३३ व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला शनिवार, दिनांक ६ सप्टेंबर रोजी थाटात निघणार आहे. यंदा श्री गणनायक रथामध्ये दगडूशेठ चे गणपती बाप्पा विराजमान होणार असून आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली.

सलग तिस-या वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दुपारी ४ वाजता बेलबाग चौकातून मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे. यंदाची प्रतिकृती असलेल्या केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराच्या विषयाप्रमाणे सांगता मिरवणूक रथाची मांडणी करण्यात आली आहे. दक्षिण भारतीय शैलीतील रथाची निर्मीती करण्यात आली आहे.

दक्षिण भारतात जसा लाकडाचा रथ साकारला जातो, तसा हा रथ तयार करण्यात आला आहे. रथावर ज्याप्रमाणे सप्तरंगांची उधळण केली जाते, तशीच इथेही करण्यात आली आहे. श्री पद्मनाभ स्वामी हे श्री विष्णूंचे मंदिर असल्यामुळे रथावर ४ गरुडमूर्ती लावण्यात आल्या आहेत. त्यापैकी २ मूर्ती ६ फूट उंचीच्या तर २ मूर्ती ३ फूट उंचीच्या आहेत. रथाचा आकार १६ बाय १६ फूट असून उंची २४ फूट इतकी आहे. रथावर झुंबरे, एलईडी व पार लाईटचे फोकस लावण्यात येणार आहेत. कलादिग्दर्शक विनायक रासकर यांनी हा रथ साकारला आहे.

सांगता मिरवणुकीबाबत माहिती देताना सुनील रासने म्हणाले, मिरवणुकीत मानवसेवा रथ व त्यामध्ये सनई-चौघडा अग्रभागी असणार आहे. मिरवणुकीत स्वरूपवर्धिनीचे पथक, केरळचे चेंदा मेलम पथक असा लवाजमा असेल. तसेच पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त देखील मोठया संख्येने सहभागी होणार आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button