आशिष सुनिल दास यांची हरियाणा येथे होणाऱ्या ६ व्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट फेडरेशन कप २०२५ स्पर्धेसाठी राज्य संघात निवड

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- संदेश बोर्डे स्पोर्ट्स फाउंडेशन संघाचे अष्टपैलू खेळाडू आशिष सुनिल दास यांची हरियाणा येथे होणाऱ्या ६ व्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट फेडरेशन कप २०२५ स्पर्धेसाठी राज्य संघात निवड झाली आहे.
आशिष याला लहानपणापासून क्रिकेट खेळाची खूप आवड होती. त्यांनी १४ वर्षाचा असताना त्याने क्लब जॉइन केला त्याने क्रिकेट मध्ये स्पिनर म्हणून बॉलिंग करायला सुरवात केली पण त्याने १–२ वर्षा नंतर फास्ट बॉलिंग प्रॅक्टीस चालू केली मग २०१६ ला त्याचे वडील वारले मग त्याने क्लब सोडला कारण त्याची फायनान्शियल कंडिशन चांगली नव्हती क्लब मध्ये खेळायची त्याने हळू हळू टेनिस क्रिकेट चालू केलं मग पावसाळी रबर बॉल वर चालू केलं मग त्याची फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण कमी वया मधे त्याने त्याचा गोलंदाजीच्या आगळी वेगळी कृतीमुळे त्याने लक्ष वेधून घेतले. या चमकदार कामगिरीची दखल घेत त्याची हरियाणा येथे होणाऱ्या ६ व्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट फेडरेशन कप २०२५ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिषच्या कामगिरीची दखल घेत त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे.या स्पर्धा पानिपत, हरियाणा येथे ३ ते ६ जून या कालावधीत होणार आहेत. आशिषच्या निवडीबद्दल पुणे, मुंबई,सोलापूर, जालना, कोल्हापूर, अहमदनगर तालुकवासियांनी अभिनंद केले आणि तो चांगला खेळाडू आहे म्हणून त्याला सगळ्या तालुका च्या लोकांनी मदत ही केली .













