ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी न्यायालयात बारा वर्ष केसेसचा चाललेला तप व संघर्ष मध्यस्थीमार्फत मिटला- ॲड. अतिष लांडगे यांची निर्णायक कामगिरी

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)न्यायालयातील दाखल प्रकरणात संवादातून वाद मिटावा त्यासाठी राष्ट्रीय मोहीम सुरू आहे. या काळात प्रलंबित केसेसचा संवादातून तोडगा काढला जाईल. पक्षकारांनी प्रकरणे संवादाने मिटवावे यासाठी प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री महेंद्र महाजन व पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती सोनल पाटील यांनी आवाहन केले होते. त्यासाठी मध्यस्थ म्हणून पिंपरी न्यायालयात ॲड.अतिश लांडगे यांची नियुक्ती केली आहे.

विवेक ( नावे बदललेली)आणि नीलिमा ( नावे बदललेली) यांचा विवाह 24/ 2 /2003 रोजी हिंदू रीतीने देवाच्या प्रमाणे झाला. नीलिमाच्या आई-वडिलांनी श्रीधर म्हणून लग्नामध्ये सात तोळे पाहुण्यांचा मानपान फ्रिज, टीव्ही, पलंग अशा सर्व वस्तू विवेकला दिल्या. विवेक हा एका राष्ट्रकृत बँकेवर वसुली अधिकारी म्हणून काम करत होता. त्याला चांगल्या प्रकारची नोकरी होती. त्यानंतर त्यांना मध्ये ज्ञानेश्वरी व राजेश अशी दोन मुले झाली. विवेक याला घरासाठी जागा घ्यायला व घर बांधकाम करायला असे नऊ ते दहा लाख रुपये नीलिमा च्या वडिलांनी त्यांना घर बांधकामासाठी दिले. त्यानंतर काही दिवस गेल्यानंतर विवेक निलिमा ला विनाकारण शिवीगाळ करत मारण करू लागला व शुल्लक कारणावरून वाद घालू लागला. नीलिमाच्या वडिलांनी त्यांचा संसार टिकावा म्हणून वारंवार त्याला समजावण्याचा प्रयत्न केला परंतु विवेक दारू पिऊन तिला मारहाण करतच राहिला. विवेक रात्री अपरात्री उशिरा घरी येऊ लागला व त्याच्या भांडणाचा परिणाम मुलांवर होऊ लागला. तरीपण नीलिमा पुढे जाऊन आयुष्य सुधारेल या आशेने विवेक सोबत संसार करीत होत्या.
काही दिवसांनी विवेक्ष वागण्यात खूपच बदल झाला तो विचित्र वागत असे मधूनच हसणे रडणे रोडवर कोणाच्याही पाया पडणे वेडेवाकडे वागणे असे प्रकार चालू होते ते मुलांना अभ्यास करून देत नसत शिकून कोणाचे भले झाले आहे तेव्हा तुमचे भले होईल असे म्हणून मुलांना अभ्यास करून देत नसत व घाणेरड्या शिव्या देत असत. नीलिमा च्या वडिलांनी त्यांच्या गावी जाऊन चौकशी केली असता त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी सांगितले की विवेकला पहिल्यापासून अशा प्रकारचा आजार आहे त्यावेळी त्यांना समजले की आपली फार मोठी फसवणूक केलेली आहे.

नीलिमाच्या वडिलांना वाटले विवेक वर कोणीतरी करणे अथवा जादूटोणा केला आहे ते खूप घाबरून गेले देव देव करून सुद्धा काही फरक पडला नाही म्हणून त्यांनी उपचारासाठी चिंचवड गावात त्याला दाखल केले व त्याचा खर्चही नीलीमाच्या वडिलांनीच केला. परंतु हॉस्पिटल बद्दल उपचार घेऊनी विवेक नियमित औषध घेत नव्हता व औषधे घेण्यास नेहमी टाळाटाळ करत होता म्हणून त्याचे वारंवार मानसिक संतुलन बिघडायचे.

2013 मध्ये नीलिमा आजारी असल्यामुळे त्या विवेक सोबत डॉक्टर कडे गेल्या. नीलिमाच्या तपासण्या करायचे असल्यामुळे डॉक्टरांनी विवेकला बाहेर बसण्यास सांगितले परंतु बाहेर का बसायला लावले या कारणावरून विवेक डॉक्टर सोबत वाद घालू लागला व दवाखान्यातून घरी आल्यानंतर त्याच कारणावरून नीलमला मारहाण केली व तिचा फोन हिसकावून घेतला. व तिला कोणासोबतही फोनवर बोलण्यास बंदी घातली. नीलमाने घरच्यांच्या शेजारच्यांच्या फोनवरून वडिलांना फोन करून सर्व हाकिकत सांगितले वडील नीलिमांच्या घरी येऊन विवेकला जाब विचारला असता विवेकने माफी मागून पुन्हा असे करणार नाही असे सांगितले. परंतु रात्र होताच विवेक परत दारू पिऊन आला व शिवीगाळ मारण करायला लागला व मनाला मला सकाळी डॉक्टरने आज का येऊ दिले नाही तुझ्यावर डॉक्टरचे काहीतरी गैरसंबंध आहेत तुझे डॉक्टर बरोबर अफेअर आहे त्यामुळे मला बाहेर काढले तुमच्यात काय चालले होते मी तुला मारून टाकीन असे बोलून नीलिमाची सर्व गोळ्या औषधे फेकून दिली. या भांडणाचा आवाज शेजारच्या लोकांनी ऐकला व निलेमाच्या आई-वडिलांना फोन लावला आणि म्हणाले तुम्ही तुमच्या मुलीला यातून घेऊन जा नाहीतर ती मरून जाईल. सन 2014 मध्ये पहाटे तीन वाजता नीलिमाचे आई-वडील विवेक च्या घरी पोहोचले असता ती जखमी रक्तबंबळ अवस्थेत होती तसेच बेशुद्ध अवस्थेत दिसली आई-वडिलांनी कसेबसे तिला उचलून सरकारी दवाखान्यात ऍडमिट केले व पोलीस स्टेशनला 498 अन्वये व विविध कलमाखाली त्याच्यावर तक्रार नोंदवली.
तदनंतर नीलिमाने 2013 मध्ये कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 चे कलम 12 प्रमाणे कलम 18,19,20,21,22 अन्वये विवेक वर आरोप करत वरील सर्व घटना सदर केस मध्ये सांगून पिंपरी न्यायालयात केस दाखल केली. 2013 पासून ही केस 2025 पर्यंत सुरू होती दरम्यानच्या काळात खेड कोर्ट, पुणे कोर्ट, पिंपरी कोर्ट येथे वेगवेगळ्या कलमांतर्गत दोघांच्या मध्ये 4 ते 5 केलेस दाखल झाल्या.

राष्ट्रीय मध्यस्थ मोहीम योजना अंतर्गत पिंपरी न्यायालयातील न्यायाधीश एस एस चव्हाण यांनी सदरची केस मध्यस्थीसाठी   ॲड.अतिश लांडगे यांच्याकडे पाठवली. अतिश लांडगे यांनी या केस मध्ये यशस्वी मध्यस्थी करत 26 लाख रुपये विवेक कडून निलिमा ला मिळाले व वेगवेगळ्या कोर्टात चालू असलेल्या केसेस काढून घ्यायच्या असे ठरले. व लगेच त्याच दिवशी साडेसात लाख रुपयांचा डीडी नीलिमाला सुपूर्त केला. अशा माध्यमातून दोघांच्या आयुष्यातील बारा वर्षाचा संघर्ष मध्यस्थीमध्ये सुटला. जाताना दोघांच्याही चेहऱ्यावर व त्यांच्या घरच्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं सुटकेचा निश्वास होता. न्यायालयाने नियुक्त केलेले प्रशिक्षित मध्यस्थ अतिश लांडगे यांना या प्रकरणात विवेक विवेक व नीलिमाचे वकील  ॲड.प्रज्ञा अमृते व  ॲड. अमोल उचाले यांचे सहकार्य मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button