चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी
चिंचवड स्टेशन परिसरातील नागरिकांचा ट्रान्सफॉर्मरसाठी मोर्चा — आमदार अमित गोरखे यांच्या निधीतून उभारणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला विरोध;

महिलांनी संघवी प्रतिनिधींना मांडल्या व्यथा
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड स्टेशन, साईबाबा नगर, दवाबाजार परिसरात वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडिततेमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येच्या पार्श्वभूमीवर आमदार अमित गोरखे यांच्या स्थानिक विकास निधीतून नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आला असून तो चिंचवड स्टेशनजवळील मॉडर्न सायकल शेजारील संघवी इंडस्ट्रियल कंपाऊंड या ठिकाणी उभारण्यात येणार होता.
मात्र, अजय संघवी यांनी या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसवण्यास विरोध दर्शविला. विशेष म्हणजे, याच ठिकाणी पूर्वीही MSEB चा ट्रान्सफॉर्मर होता आणि सदर जागा महापारेषण कंपनीच्या अखत्यारीतील उच्चदाब वाहिनीखाली येते.
या विरोधाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी भाजप शहर जिल्हा उपाध्यक्ष गणेश लंगोटे यांच्या नेतृत्वाखाली संघवी यांच्या गेटसमोर मोर्चा काढला आणि निदर्शने केली. महिला भगिनींनी संघवी प्रतिनिधींना आपले दुःख व व्यथा मांडल्या. त्यानंतर अजय संघवी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आपली भूमिका समजावून सांगितली व प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले.












